पाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमानं लोकवस्तीत कोसळलं

पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानाला कराचीमध्ये अपघात झाला असून साधारण १०० प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान लोकवस्ती असलेल्या परिसरात कोसळलं असल्याची माहिती मिळत आहे. लाहोर येथून कराचीला जाणारे हे विमान कराची विमानतळावर लँड होण्याच्या एक मिनिटापूर्वी इमारतींच्यामध्ये कोसळले. पीआयएचे प्रवक्त अब्दुल सत्तान यांनी या अपघाताच्या बातमीला दुजोरा दिला आहे. लोकवस्तीमध्ये विमान पडल्याने तेथील रहिवाशांना तातडीने बाहेर काढले जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरू 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका इमारतीजवळ धुराचे लोळ उठले असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका इमारतीजवळ धुराचे लोळ उठले असल्याचे दिसत आहे. हे विमान निवासी भागात कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे अद्याप या घटनेत किती जीवितहानी झाली याची माहिती समोर आलेली नाही.

विमान घरांवर कोसळल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर परिसरात प्रचंड धूर दिसू लागला. जवळपास सहा ते १२ घरांचे तर काही गाड्यांचेही नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. लॉकडाउननंतर दोनच दिवसांपूर्वी विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा –

नोकरी हवी ? येथे करा अर्ज