घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआम्ही बर्बाद झालोय, मदत हवीये - पाकिस्तान!

आम्ही बर्बाद झालोय, मदत हवीये – पाकिस्तान!

Subscribe

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना पाकिस्तानमध्ये नक्की काय चालू आहे, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पाकिस्तानमधील लोकांमध्ये देखील काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अखेर इम्रान खान यांचे अर्थविषयक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी पाकिस्तानमधली खरी परिस्थिती जगासमोर मांडली आहे. त्यांनी हे मान्य केलं आहे की पाकिस्तानमधली आर्थिक परिस्थिती प्रचंड वाईट असून पाकिस्तानला तातडीने मदतीची गरज आहे. ‘आम्ही बर्बाद झालो आहोत. आम्हाला मदतीची गरज आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तानची अर्थव्यवस्था दबली होती. त्यात आता कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट अधिकच वाढवलं आहे’, असं ते म्हणाले आहेत. न्यूज १८ ने ‘डॉन’च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानचा तोटा ९ टक्क्यांवर!

अब्दुल हाफिज शेख हे पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री पदावर आहेत. मात्र, ते फक्त इम्रान खान यांचे अर्थविषयक सल्लागार म्हणूनच काम करत असल्याचं बोललं जातं. सर्व निर्णय स्वत: इम्रान खानच घेत असल्याचं देखील सांगितलं जातं. अब्दुल शेख म्हणाले, ‘कोरोना व्हायरसचं संकट येण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये तोट्याचा अंदाज ७.६ टक्क्यांपर्यंत होता. मात्र, आता तो ८ टक्क्यांवर गेला आहे. तो ९ टक्क्यांवर देखील जाऊ शकतो. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत कराची रक्कम येत नसल्यामुळे मोठी आर्थिक समस्या उभी राहू शकते’.

- Advertisement -

IMFची आर्थिक मदत

दरम्यान, पाकिस्तानला आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ६ अरब डॉलरचं बेलआऊट पॅकेज दिलं आहे. तीन वर्षांसाठी हे पॅकेज असेल. याव्यतिरिक्त आयएमएफने पाकिस्तानला १.३८ अरब डॉलरचं रॅपिड फायनान्स पॅकेज देखील दिलं आहे, जेणेकरून कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा पाकिस्तानला सामना करता येऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -