पीओके नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंकर बनवा – पाकिस्तान

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असल्यामुळे पाकिस्तानने एलओसी जवळील गावांना सल्ला दिला आहे. गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बंकर बनवण्याचा सल्ला दिला आहे.

Indian-Army
प्रातिनिधिक फोटो

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वातावरण गरज झाले आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होईल अशी भिती पाकिस्तानकडून वर्तवली जात आहे. याबद्दल दोन्ही देशांनी अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र पाकिस्तान अंतर्गत काश्मीर (पीओके) मधील ग्रामीण भागातील लोकांना पाकिस्तानने बंकर बनवण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशा अंतर्गत तणावाची स्थिती असल्यामुळे हा सल्ला पाकिस्तानी सरकारकडून देण्यात आला आहे. भारताकडून हल्ला झाल्यावर येथील ग्रामीण रहिवाशांनी सुरुक्षित राहावे असे पाकिस्तान सरकारने सांगितले आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळीही पाकिस्तान सरकारने येथील ग्रामीण रहिवशांना असाच सल्ला दिला होता.

काळजी घेण्याचा सल्ला

भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची सुरुवात पाकिस्तान अंतर्गत काश्मीर पासून होणार आहे. यामुळे येथील गांवामध्ये नागरिकांची सुरक्षेची जवाबदारी पाकिस्तानी सैन्याची आहे. रात्रीच्या सुमारास या गावांच्या रस्त्यावरील आणि घरातील लाईट बंद केली जाते. याच बरोबर प्राण्यांना एलओसीजवळ घेऊन न जाण्यास पाकिस्तानने सांगितले आहे.