घरताज्या घडामोडीkabul airport attack: काबूल हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन; हल्ल्यामागे दहशतवादी अस्लम फारुखचा हात

kabul airport attack: काबूल हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन; हल्ल्यामागे दहशतवादी अस्लम फारुखचा हात

Subscribe

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी रात्री बॉम्बस्फोट (Blast) झाले. यामुळे संपूर्ण काबूल हादरलं असून आता या हल्ल्यातील मृत्यूचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. माहितीनुसार या हल्ल्यात ७२ लोकांचा मृत्यू झाला असून १४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे १३ सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा इशारा दिला आहे. आता काबूल विमानतळावरील हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.

सध्या पाकिस्तान दहशतवादाचा बालेकिल्ला बनला आहे. जगातील कुठेही दहशतवादी असो त्याची मूळ पाकिस्तानशी जोडलेली असतात. त्यामुळे जगातील अनेक देश पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करत आहेत. आता गुरुवारी काबूलमध्ये झालेल्या आत्मघाती सीरियल बॉम्बस्फोट हे स्पष्ट झाले आहे की, या हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हल्ल्याच्या मागे ज्या भयानक दहशतवादी अस्लम फारुखचे नाव घेतले जात आहे, तो पाकिस्तानी आहे. या हल्ल्याची योजना पाकिस्तानमध्ये आखली गेल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

सीएनएनने दावा केला आहे की, काबूल हल्ल्याच्या मागे अस्लम फारुख आहे. अस्लम फारुख पाकिस्तानी आयएसआयएस-के (ISIS-K)चा प्रमुख आहे. काबूल गुरुद्वारमध्ये ज्या हल्ल्यामुळे २७ लोकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये फारुखचा हात होता. ४ एप्रिल २०२०मध्ये अफगाण सैनिकांनी याला अटक केली होती. यादरम्यान अस्लम फारुखने या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे मान्य केले होते.

पाकिस्तानी दहशतवादी अस्लम फारुख पहिल्यापासून लष्कर-ए-तोयबासोबत जोडला गेला होता. परंतु नंतर तो तहरीक-ए-तालिबानशी जोडला गेला. यानंतर त्याची दहशत वाढू लागली आणि २०१९मध्ये फारुख आयएसआयएस-केचा प्रमुख म्हणून सामील झाला.

- Advertisement -

हेही वाचा – kabul airport attack: काबूल हल्ल्याची ISIS-Kने स्वीकारली जबाबदारी; हल्लेखोराचा फोटो केला जारी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -