घर देश-विदेश ब्राह्मोस क्षेपणास्त्र चूकून डागले गेल्याने पाकिस्तानचे कोटींचे नुकसान, केंद्राने कोर्टात दिली माहिती

ब्राह्मोस क्षेपणास्त्र चूकून डागले गेल्याने पाकिस्तानचे कोटींचे नुकसान, केंद्राने कोर्टात दिली माहिती

Subscribe

बडतर्फ विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने आपली बाजू मांडत चूकून डागले गेलेल्या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानचे एकूण 24 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

BrahMos Missile : गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानवर चुकून ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले गेले होते. हे क्षेपणास्त्र कारवाई भारताने मुद्दाम केली, असे त्यावेळी पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणी भारतीय वायुसेनेच्या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पण या प्रकरणावरून आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. बडतर्फ करण्यात आलेले विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होत असताना केंद्र सरकारने न्यायाधिशांसमोर आपली बाजू मांडली.

हेही वाचा – Wrestlers Throw Medals In Ganges : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक; गंगेत विसर्जित करणार मेडल

- Advertisement -

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, या चुकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. या चुकीमुळे पाकिस्तानचे 24 कोटींचे नुकसान झाले असल्याने ते भारताला द्यावे लागणार आहे. ज्यामुळे आता भारताला 24 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. यासोबतच पाकिस्तानवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र चूकून डागले जाणे म्हणजे हा मोठा निष्काळजीपणा असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

बडतर्फ विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. या प्रकरणी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेला व्यापक धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन याचिकाकर्त्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

कोणताही द्वेष न करता जनहितार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. भारतीय हवाई दलात 23 वर्षांनंतर अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहता अशी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रकारचे संभाव्य धोके निर्माण झाले होते, युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊन भारतीय हवाई दलासह देशाच्या प्रतिष्ठेला तडा गेला असता, असेही यावेळी केंद्र सरकारच्या बाजून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दल कायदा 1950 अंतर्गत बडतर्फीच्या निर्णयाला याचिकाकर्ते विंग कमांडर शर्मा यांनी आव्हान दिले होते. याचिकेत विंग कमांडरला केवळ देखभालीशी संबंधित व्यावसायिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात होते, ते ऑपरेशन पार पाडण्याशी संबंधित नव्हते, असे याचिकेत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. पाकिस्तानने हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले. या प्रकरणी राजनाथ सिंह बोलताना म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्राचा अपघाती प्रक्षेपण झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. “दुर्दैवाने 9 मार्च रोजी एक क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडली. आम्हाला नंतर कळले की ते पाकिस्तानात उतरले होते,” असे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते.

- Advertisment -