Black Magic In Ind Vs Pak Match : कराची : चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगला. आणि आपल्या या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला भारताने लीलया पराभूत केले. मात्र, पराभवाचा हा धक्का पाकिस्तानी चाहते आणि त्यांची मीडिया अजून पचवू शकलेले दिसत नाहीत. पाकिस्तानातील एका यूट्युब चॅनलने तर कहरच केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. (pakistan media says 22 pandits performed black magic to help india win)
रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अत्यंत हाय व्होल्टेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत – पाकिस्तानमध्ये सामना रंगला. कॉंटे की टक्कर होईल असे वाटत असतानाच भारताने अगदी सहज हा सामना खिशात टाकला. भारत – पाकिस्तान सामना म्हणजे दोन्ही देशांसाठी जवळपास जीवनमरणाचा प्रश्नच असतो. त्यामुळेच हा सामना दोन्ही देशातील चाहते अगदी डोळ्यात प्राण वगैरे आणून बघत असतात. तर अशा या हाय व्होल्टेज सामन्यात भारत केवळ विजेताच ठरला नाही तर या सामन्यात कोहलीने तडाखेबंद शतक झळकावून पाकिस्तानच्या आव्हानातली हवाच काढून टाकली.
हेही वाचा – IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर देशविरोधी घोषणा, मालवणमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
हा पराभव पाकिस्तानी चाहते आणि मुख्य म्हणजे मीडियाच्या पचनी पडलेला नाही. अशातच एका पाकिस्तानी यूट्युब चॅनलवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत भारताच्या विजयाबाबत काहीही दावे करण्यात आले आहेत. ते ऐकल्यावर हसू आल्याशिवाय राहात नाही.
या व्हिडीओनुसार, एका रंगलेल्या चर्चेतील पाहुण्यांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताने 22 पंडितांना दुबईच्या या मैदानात आणून ठेवले होते. हे पंडित काळी जादू करतील आणि खेळाडूंचे लक्ष विचलित होईल, असे भारताचे नियोजन होते, असे या लोकांचे म्हणणे होते. तर दुसऱ्या एका पाहुण्यांनी देखील असेच काहीसे विधान केले. भारताने पाकिस्तानात यायला विरोध केला कारण त्यांच्या पंडितांना पाकिस्तानात येण्याची परवानगी नाही.
हेही वाचा – Gill Vs. Abrar : गिलला चकवा देणाऱ्या अबरारचे ते हावभाव…, वासिम अक्रमकडून कानपिचक्या
या चर्चेदरम्यान आणखी एका पाकिस्तानी पॅनलिस्टने म्हटले आहे की, हा सामना व्हायच्या आधी एक दिवस सात पुजारी जादू करण्यासाठी मैदानात आले होते. बोलता बोलता त्यांनी हार्दिक पांड्या देखील जादू करत असल्याचे म्हटले आहे.
22 पंडित बाहर से और तीन पंडित रोहित ,हार्दिक और अय्यर टीम में फिर तो पाकिस्तान को हारना ही था 🤣🤣 pic.twitter.com/zaNsq6PUjW
— Raja Babu (@GaurangBhardwa1) February 24, 2025
पाकिस्तानी मीडियाने पराभवासाठी काळ्या जादूला दोषी ठरवण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील ICC विश्वचषक 2023 दरम्यान, बीसीसीआयने काळ्या जादूच्या साहाय्याने आपल्याला हरवल्याचे एका पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले होते.