घरताज्या घडामोडीआम्ही काही भारत नाही, श्रीलंकन मॅनेजरला जिवंत जाळल्याच्या प्रकारावर पाकिस्तानी मंत्र्याचे वादग्रस्त...

आम्ही काही भारत नाही, श्रीलंकन मॅनेजरला जिवंत जाळल्याच्या प्रकारावर पाकिस्तानी मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Subscribe

पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या मॅनेजरला फॅक्टरीबाहेर रस्त्यावर जिवंत जाळल्याच्या घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरुन पाकिस्तानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. परंतु पाकिस्तानच्या मंत्र्यांनी या प्रकरणावरुन भारताविरोधात वक्तव्य केलं आहे. आम्ही काही भारत नाही, असे विधान पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केलं आहे. भारतात मुस्लिम लोकांविरोधात हिंसाचार होत असतो परंतु त्यावर कोणी लक्ष देत नाही असा आरोप पाकिस्तानी मंत्र्यानी केला आहे.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारची सर्व अल्पसंख्यांक समुदायाला सुरक्षा देण्याची जबाबदारी आहे. भारतात मुस्लिम लोकांवर हल्ले होत असतात परंतु त्यांच्यावर कोणी लक्ष देत नाही. मात्र पाकिस्तानमध्ये श्रीलंकन मॅनेजरला जाळल्याच्या घटनेविरुद्ध आवाज उठवत आहेत असे वक्तव्य पाकिस्तानी मंत्र्यांनी केलं आहे.

- Advertisement -

पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया

पाकिस्तानचे सुचना मंत्र्यांनी देशातील नागरिक या घटनेच्याविरोधात असल्याचे सांगत आहेत. परंतु संरक्षण मंत्र्यांचे विधान त्यांच्याविरोधात आहे. मुस्लिम कट्टरपंथ्यांनी धमकी दिली आहे की, आरोपींविरोधात सुनावणी सुरु असताना रक्ताचे सडे पडतील. संरक्षण मंत्री खटक यांनी म्हटलं आहे की, लहान मुले आहेत ती मोठो होतील. इस्लामचे दिवस असल्यामुळे जोशात आहेत. उत्साहात येऊन काम करत असतात. इस्लामची घोषणा होताच त्यांच्या अंगात जोश आला याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानची वाटचाल विनाशाकडे होत आहे. ही एक असामान्य बाब असल्याचे म्हणत पाकिस्तानी मंत्र्यांनी घटनेचं समर्थन केलं आहे. तसेच श्रीलंकेच्या नागरिकाला जाळत असताना ज्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याला वीरता पदक देण्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा : Pakistan Inflation: पेट्रोलपेक्षा दूध महाग, पाकिस्तानने महागाईत नेपाळ-भूटानलाही मागे टाकलं

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -