Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश सत्ता वाचवण्यासाठी इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीवर जादूटोण्याचा आरोप

सत्ता वाचवण्यासाठी इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीवर जादूटोण्याचा आरोप

Subscribe

पाकिस्तानमधील फ्लोर टेस्टुपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिसरी पत्नी बुशरा आता इम्रान खान यांची खुर्ची वाचवण्यासाठी काळी जादू करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. बुशरा इम्रान खान यांच्या घरात जिवंत कोंबड्या जाळून जादूटोणा करत असल्याचे आरोपही आता होत आहे.

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी हिला पिंकी पीरनी नावाने ओळखले जाते. पण विरोधकांकडून त्यांच्यावर जादूटोणा करत असल्याचे आरोप होत आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच दावा केला आहे की, इम्रान खान यांनी बनी गाला या त्यांच्या घरात अनेक टन मांस जाळले जात आहे. त्याचवेळी नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम हिने आरोप केला की, इम्रान खान यांचे सरकार वाचवण्यासाठी जादूटोणा करत आहेत. तर दुसरीकडे, पीपीपी पक्षाचे नेते बिलावल भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानमध्ये बुशरा बीबीच्या इच्छेशिवाय कोणतीही पोस्टिंग केली जात नाही.

शाहबाज शरीफ यांचा गंभीर आरोप

- Advertisement -

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आणि आता पंतप्रधानपदाचे विरोधी दावेदार शाहबाज शरीफ यांनी बुशरा बीबीवर मोठा आरोप केला आहे. इम्रान खान यांनी बनी गालामध्ये मोठ्या प्रमाणात मांस जाळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, मी पूर्ण जबाबदारीने हा दावा करत आहे. ही परिस्थिती आहे. असे असतानाही इम्रान खान मदिना संस्थानाबद्दल वक्तव्य करत आहेत. एका टीव्ही चॅनलशी बोलताना शरीफ म्हणाले की, पाकिस्तानमध्ये लोक अन्नासाठी मरत आहेत, मुले दुधासाठी तडफडत आहेत. मात्र बनी गालामध्ये जादूटोण्यासाठी जिवंत कोंबड्या जाळल्या जात आहेत.

बुशरा बीबी पहिल्यांदाच चर्चेत आलेली नाही. बुशरा बीबी या आध्यात्मिक गुरु आहेत. त्याच्यावर यापूर्वीही जादूटोण्याचे आरोप झाले आहेत. त्या इम्रान खान यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, असे आरोपही पाकिस्तानमध्ये होत आहेत.

- Advertisement -

बुशरा बीबीबाबत पाकिस्तानमध्ये अनेक प्रकारचे दावे केले जातात. असे म्हटले जाते की, त्याच्याकडे दोन जिन्न आहेत, जे त्यांना कोणतीही भविष्यवाणी करण्यात मदत करतात. बुशरा बीबीकडे सल्ला घेण्यासाठी जो कोणी येईल, त्याला त्या जिन्यांसाठी मांस आणावे लागते. तथापि, या अफवांना कधीही पुष्टी मिळाली नाही.

विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये इम्रान खान जेव्हा न्यूयॉर्कमधील महासभेत जम्मू-काश्मीरबाबत भारताविरोधात वक्तव्य करण्यासाठी आले होते, तेव्हा पाकिस्तानमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी इम्रान खान यांनी समर्थकांसमोर पत्नीचे आभार मानले. ते म्हणाले होते की, मी विशेषतः बुशरा बीबी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी काश्मीरवरील माझ्या भाषणासाठी खूप प्रार्थना केली.


“भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान”, सलमान खानच्या विधानाने चर्चांना उधाण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -