पाकिस्तानी न्यूज चॅनेल DAWN हॅक, स्क्रीनवर झळकला तिरंगा

pakistan news channel dawn hacked shows indian tricolour
पाकिस्तानी न्यूज चॅनेल DAWN हॅक, स्क्रीनवर झळकला तिरंगा

पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘डॉन’ (DAWN) हॅक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तवाहिनी हॅक केल्यानंतर स्क्रीनवर भारताचा तिरंगा झळकला. यासह स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. वृत्तवाहिनी हॅक झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘डॉन’ या वृत्तवाहिनीवर जाहिरात सुरु असताना अचानक स्क्रीनवर भारतीय तिरंगा झळकला. या सोबत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

डॉनने दिले चौकशीचे आदेश

चॅनलवर हा व्हिडिओ किती काळ प्रसारित झाला हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान, डॉनने उर्दूमध्ये ट्विट केलं आहे की डॉन प्रशासनाने याप्रकरणी त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत. डॉनने लिहिलं की डॉन न्यूज त्याच्या स्क्रीनवर भारतीय ध्वजाचं अचानक प्रसारण आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मजकुराची तपासणी करीत आहे. एजन्सी या प्रकरणाचा तपास करीत आहे आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचताच प्रेक्षकांना त्याची माहिती देण्यात येईल.