घरदेश-विदेश'पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात'; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

Subscribe

आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यापासून या प्रदेशांमध्ये विकासाची अनेक कामे जोमाने सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा सुद्धा मागील अनेक वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच 1994 सालात भारतीय संसदेने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानातून पुन्हा भारतात घेण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. पण तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. याच संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू – काश्मीरमध्ये शौर्यदिनाचे औचित्य साधत एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर लवकरच भारतात येईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. (‘Pakistan occupied Kashmir soon in India’; Big statement by Defense Minister Rajnath Singh)

भारतीय लष्कराचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या पायदळाचे देशरक्षणातील योगदान गौरविण्यासाठी दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. 1947 साली याच दिवशी भारतीय लष्करातील पायदळाचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले घुसखोर माघारी गेले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. म्हणून देशाच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  टाटा बनवणार भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान

आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल, असे संरक्षणमंत्री म्हणाले. राजनाथ सिंह यांनी इतरही काही मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. ‘भारतीय लष्कर जगातील सर्वोत्तम लष्कर आहे. 5 ऑगस्ट 2019 साली जम्मू आणि काश्मीर हे पुन्हा भारताला जोडण्याची मोहीम सूर करण्यात आली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान पुन्हा भारताचा भाग होत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नाही, असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

- Advertisement -

तर तो दिवस फार दूर नाही
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख आम्ही समजू शकतो. पाकिस्तानकडून त्यांच्या सर्व हक्काचं उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाख विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि ही केवळ सुरुवात आहे. सोबतच पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात समाविष्ट होईल आणि तो दिवस फार दूर नाही’ असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

हे ही वाचा –  आण्विक पर्यायाचा अवलंब करू नये, राजनाथ सिंह यांचे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना आवाहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -