घरदेश-विदेशपाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार? लष्कराच्या हालचालींना वेग

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार? लष्कराच्या हालचालींना वेग

Subscribe

काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायम तणावाची स्थिती पाहायला मिळाली.

मागील अनेक वर्षांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही. पण याच संदर्भांत आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केले आहे. त्यामुळेच हा भाग परत मिळविण्यासाठी भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली सुरु झाल्या आहेत

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज एक महत्वपूर्ण विधान केले आहे. पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज झालाआहे. भारतीय सेना कोणत्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

- Advertisement -

भारताकडून अशा हालचालींना वेग आलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भांत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित येत आहे. पीओकेसाठी मागील अनेक वर्षांपासून भारत प्रयत्न करत आहे. अशातच इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत.

हे ही वाचा – जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामधून एका दहशतवाद्याला अटक; रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

- Advertisement -
प्रातिनिधीक फोटो

पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात परत येणार
३० जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एक विधान केले होते. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता आहे असे त्यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात सांगितले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये कश्मीर प्रश्नावरून नेहमीच वाद राहिला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायम तणावाची स्थिती पाहायला मिळाली. अशातच आता पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात पुढे नेमके काय होणार हे महत्वाचे आहे.

दरम्यान याच संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 27 ऑक्टोबरला शौर्यदिनाचे औचित्य साधत एक मोठे वक्तव्य केले होते. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख आम्ही समजू शकतो. पाकिस्तानकडून त्यांच्या सर्व हक्काचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाख विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि ही केवळ सुरुवात आहे. पाकव्याप्त जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात समाविष्ट होईल आणि तो दिवस फार दूर नाही, असे संरक्षणमंत्री म्हणाले होते.

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यापासून या प्रदेशांमध्ये विकासाची अनेक कामे जोमाने सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा सुद्धा मागील अनेक वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच 1994मध्ये भारतीय संसदेने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानातून पुन्हा भारतात घेण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. पण तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही.

हे ही वाचा –  जम्मू आणि काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान, रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -