Pakistan on boil : इम्रान खान यांच्या आझादी मोर्चाला हिंसक वळण, समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची

Pakistan on boil Imran Khan's independence march turn in to violence supporters clash with police
Pakistan on boil : इम्रान खान यांच्या आझादी मोर्चाला हिंसक वळण, समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता गेल्यानंतर तात्काळ निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणी करत आहेत. या मागणीसाठी त्यांनी आझादी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या समर्थकांनी हिंसेचा मार्ग अवलंबल्यामुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी समर्थकांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली आहे. तसेच अनेक ठिकाणी पोलीस आणि समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. इस्लामाबादमध्ये आंदोलकांनी गाड्या आणि झाडांना आग लावली आहे. रावळपिंडी, कराची, लाहोर आणि खैबर पखुनख्वा येथे झालेल्या गोंधळानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या समर्थकांनी राजधानी इस्लामाबादमध्ये हिंसाचाराचा अवलंब केला. इस्लामाबादमध्ये रॅली काढण्याची घोषणा इम्रान खान यांच्याकडून करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये लवकरच निवडणुका घ्यावात अशी मागणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. आझादी मोर्चातील आंदोलकांनी शहरात जाळपोळ केली आहे. यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. झाडे आणि वाहनांना लावलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला अग्रिशमन दलाच्या गाड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच रेड झोनमध्ये कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही, रेड झोनमध्ये प्रवेश केल्यास कारवाई करण्यात येईल. अनेक ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहेत. असे इस्लामाबाद पोलीस महानिरीक्षकांनी ट्विट केलं आहे.

इम्रान खान इस्लामाबादपासून ५० किमी अंतरावर

इम्रान खान आंदोलनानंतर इस्लामाबादपासून ५० किमीच्या अंतरावर आपल्या समर्थकांसह थांबले आहेत. शाहबाज शरीफ सरकार सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर करेपर्यंत ते आणि त्यांचे समर्थक राजधानीतील डी-चौक रिकामा करणार नाहीत. आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला आहे आणि इंशाअल्लाह इस्लामाबादच्या दिशेने जात आहोत. सरकारची दडपशाही आणि फॅसिझम आपला मोर्चा थांबवू किंवा रोखू शकत नाही असे इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

लष्कराची मदत घेण्याचा निर्णय

इस्लामाबादमधील परिस्थिती गोंधळात पडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि तेथे असलेल्या सरकारी कार्यालयांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला. आणि अतिशय संवेदनशील म्हणजे रेड झोनमध्ये बदलले. सरकारने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संविधानाच्या कलम 245 अंतर्गत लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.


हेही वाचा : यासीन मलिकच्या शिक्षेवेळी सुरक्षा दलावर दगडफेक, श्रीनगरमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंद