घरताज्या घडामोडीवैमानिकाच्या 'या' चुकीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचा झाला मोठा अपघात!

वैमानिकाच्या ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचा झाला मोठा अपघात!

Subscribe

एअर ट्रॅफिक कंट्रोलने वैमानिका लँडिंग होण्यापूर्वी दोनदा इशारा दिला होता.

शुक्रवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानाचा कराचीमध्ये मोठा अपघात झाला. दरम्यान जर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या इशाऱ्याकडे वैमानिकाने लक्ष दिले असते तर हा विमानाचा मोठा अपघात टाळता आला असता. विमानाचे लँडिंग जवळ येत असल्यामुळे विमानाच्या उंची आणि वेगाच्या इशाऱ्याकडे वैमानिकाने कानाडोळा केला, असे म्हटले जात आहे.

एअर ट्रॅफिक कंट्रोलचा अहवाल

दुपारी १.०५ वाजता – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअर लाईन्सचे विमान लाहोर विमानतळावरून रवाना झाले. त्या दुपारी २.३० वाजता कराचीमधील जिन्नी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर लँडिग होणार होते.

- Advertisement -

एअर ट्रॅफिक कंट्रोलचा पहिला इशारा

दुपारी २.३० वाजता – हे विमान २.३० वाजता कराची विमानतळावर लँडिंग करणार होते. पण त्यावेळी ते कराचीपासून १५  मैलांच्या अंतरापासून दूर होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलने वैमानिकाला पहिला इशारा दिला होता. इशारा देताना हे विमान ७००० फूट ऐवजी १०,००० फूट उंचीवर होते. विमानाची उंची कमी करण्याचा इशारा वैमानिकाला देण्यात आला होता.

एअर ट्रॅफिक कंट्रोलचा दुसरा इशारा

पहिल्या इशाऱ्याच्या काही मिनिटानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने दुसरा इशारा दिला. पुन्हा एकदा वैमानिकाला वेग आणि उंचीबद्दल सतर्क केले गेले. पण वैमानिकाने दुसऱ्याही इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोल उत्तर दिले की, तो ही परिस्थिती हाताळेल. त्यानंतर वैमानिकाने सांगितले की, तो लँडिंगसाठी तयार आहे.

- Advertisement -

वृत्तसंस्था एएफपीने आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी कराचीमध्ये घडलेल्या घटनेत ९७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन प्रवाशांचा जीव वाचला आहे. यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सदस्य होते.

पाकिस्तानमधील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील झालेल्या विमानाच्या अपघातामध्ये गंभीरपणे जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएन चाचणी घेण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, जळलेल्या देहाचे इतके नुकसान झाले आहे की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. प्रवाशांच्या कुटुंबातील सदस्यांनी मृतांचे नमुने घेऊन येण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.


हेही वाचा – Coronavirus: वुहानच्या लॅबमध्ये तीन प्रकारचे व्हायरस सापडले, मात्र कोरोनासारखा नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -