पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरात ३० रुपयांनी वाढ; १ लीटर पेट्रोलची किंमत २०० रुपये पार

पाकिस्तानात (Pakistan) पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Diesel) दरात ३० रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने एक लीटर पेट्रोलची किंमत पाकिस्तानी रुपयांनुसार २०० रुपये पार गेली आहे.

पाकिस्तानात (Pakistan) पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Diesel) दरात ३० रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने एक लीटर पेट्रोलची किंमत पाकिस्तानी रुपयांनुसार २०० रुपये पार गेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची माहिती पाकिस्तानचे मंत्री मिफ्ताह इस्माईल (Miftah Ismail) यांनी दिली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर ३० रुपयांनी वाढल्याने आता पाकिस्तानी रुपयांनुसार, १ लीटर पेट्रोलची किंमत २०९.८६ रुपये झाली आहे. तसेच, डिझेलची किंमत २०४.१५ रुपये झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती ३१ मेनंतर वाढल्या असल्याचे समजते.

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान (pakistan former pm imran khan) यांनी टीका केली आहे. इंधनाच्या किंमती वाढल्याने ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

“आयातीत सरकारने पेट्रोलियमच्या किमती ४० टक्के किंवा ६० रुपये प्रति लिटरने (दोनदा) वाढवल्या आहेत. यामुळे जनतेवर ९०० अब्ज रुपयांचा बोजा वाढणार असून मूलभूत गरजांच्या किमती वाढणार आहेत. तसेच, विजेच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाल्याने संपूर्ण देशाला धक्का बसणार आहे. महागाई ३० टक्क्यांनी वाढू शकते, जी ७५ वर्षांतील सर्वोच्च असेल.”, असे इम्रान यांनी लिहिले.

इम्रान खान यांच्या या ट्विटनंतर पाकिस्तान सरकारकडून त्यांना काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – LPG गॅस सिलिंडरवर Subsidy मिळणाऱ्यांना मोठा झटका, ग्राहकांच्या खात्यात Subsidy येणाऱ्यावर शंका?