Pakistan : पाकिस्तान आर्थिक संकटातून जात असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनीही विक्रमी पातळी गाठल्याचे पाहायला मिळत आहे. काळजीवाहू सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे किमतींनी पेट्रोल आणि डिझेलच्या आता नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. रोखीच्या भीषण टंचाईचा सामना करणार्या पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 330 रुपयांच्या आसपास गेले आहेत, येथील महागाईचा दर आधीच दुहेरी आकड्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जनतेच्या त्रासात आणखीनच भर पडल्याचे पाहायला मिळत आहे. (Pakistan Petrol price reaches record level The price per liter has become so much people are suffering due to inflation)
काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी रात्री पेट्रोलच्या दरात 26.02 रुपये आणि डिझेलच्या दरात 17.34 रुपयांनी वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. यानंतर पेट्रोल आणि ‘हाय-स्पीड’ डिझेलच्या (एचएसडी) किमती प्रतिलिटर 330 रुपयांनी वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलची किंमत 330 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे.
हेही वाचा – “ओझोन मुळे वाढवली महागाई”; हवामान अभ्यासकाच्या ‘या’ दाव्याने खळबळ
31 ऑगस्ट रोजी काळजीवाहू सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सलग दुसऱ्यांदा वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 300 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेल्या होत्या. 31 ऑगस्ट रोजी काळजीवाहू सरकार सत्तेवर येऊन महिनाही उलटला नाही, तरीही सलग दुसऱ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 रुपयांनी वाढ झाली.
New Petrol Price Per litre: Rs 331
New Diesel price per litre: Rs 329Welcome back to Purana Pakistan. pic.twitter.com/zKJEIh3Miz
— PTI (@PTIofficial) September 15, 2023
यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 17 आणि 20 रुपयांची वाढ केली होती. 1 ऑगस्ट रोजी मागील सरकारने आपला घटनात्मक कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पेट्रोलच्या दरात वाढ केली होती. दरवाढीची घोषणा करताना माजी अर्थमंत्री इशाक दार म्हणाले होते की, जागतिक बाजारातील वाढीमुळे जनतेवर कमीत कमी बोजा टाकण्याचा सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.
हेही वाचा – तुम्हें कभी देश तोडने नहीं दूंगा…, काँग्रेसच्याच Animation Video वरून भाजपाचा पलटवार
इशाक दार यांनी हायस्पीड डिझेलच्या दरात 19 रुपये 90 पैशांनी आणि पेट्रोलच्या दरात 19 रुपये 95 पैशांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर हायस्पीड डिझेलच्या दरात 273 रुपये 40 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलची नवीन किंमत 272 रुपये 95 पैसे झाली आहे.