Pakistan On Kashmir: काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान PM इम्रान खान यांची पुन्हा आगपाखड, म्हणाले…

Pakistans PM Imran Khan accuses on India

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या विषयावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी चांगल्या शेजाऱ्यांप्रमाणे टेबलावर बसून हे प्रकरण सोडवलं पाहीजे, असं इम्रान खान एका मुलाखतीत म्हणाले. हाच मुद्दा असाच सुरू राहीला तर दोन अणुशक्तींमध्ये नेहमीच संघर्ष होण्याची शक्यता कायम राहील. त्यामुळे तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर होय असं असेल. दोन्ही देशांमधला ऐकमेव मुद्दा काश्मीर आहे. परंतु हा मुद्दा एकाच टेबलावर बसून मीटिंगच्या स्वरूपात सोडवला पाहीजे, असं इम्रान खान म्हणाले.

दहशतवाद, वैमनस्य आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणात इस्लामाबादसोबत सामान्य शेजाऱ्यांसारखे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. दहशतवाद आणि वैमनस्यमुक्त वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचे भारताने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील, असे वारंवार भारताने स्पष्ट केले आहे.

सीमेवर चुकीचे आकलन केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का, असा सवाल पंतप्रधान इम्रान खान यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, काश्मीरमधील २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली लष्करी अडचण आणखी वाढू शकते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात शक्तिशाली देशाचे प्रमुख म्हणून बोलावले होते. आपण हा काश्मीर प्रश्न सोडवणे खूप महत्त्वाचे आहे.

माझे सरकार सत्तेवर येताच मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पहिल्यांदा भारताशी संपर्क साधला. आमच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल तर आम्ही तुमच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकू, यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न केल्याचा दावा इम्रान खानने केला. द्विपक्षीय संबंध सामान्य न करण्यासाठी त्यांनी विचारधारेला दोष दिला. आज नाही तर उद्या अमेरिकेला तालिबान सरकारला मान्यता द्यावी लागेल, हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला.


हेही वाचा : बग शोधल्याने भारतीयाला गुगलचे ६५ कोटींचे बक्षीस, वर्षभरात Google च्या २३२ vulnerability केल्या रिपोर्ट