घरताज्या घडामोडीइम्रान खान यांच्या हत्येचा कट पंतप्रधान शाहबाज यांनी रचला; खान यांच्या सल्लागाराचा...

इम्रान खान यांच्या हत्येचा कट पंतप्रधान शाहबाज यांनी रचला; खान यांच्या सल्लागाराचा गंभीर आरोप

Subscribe

लाँग मार्च घेऊन इस्लामाबादच्या दिशेने निघालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुजरावाला येथील अल्लाहवाला चौकात हल्ला करण्यात आला. हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इतरांसोबत मिळून इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

लाँग मार्च घेऊन इस्लामाबादच्या दिशेने निघालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुजरावाला येथील अल्लाहवाला चौकात हल्ला करण्यात आला. हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इतरांसोबत मिळून इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी हा आरोप केला आहे. (Pakistan pm shahbaz sharif rana sanaullah and faisal makes conspiracy to kill imran khan rauf hassan told)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि मेजर जनरल फैसल यांनी इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, या तिघांवरही हत्येचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

इम्रान खान समर्थकांना संबोधित करत असताना एका व्यक्तीने त्याच्या कंटेनरवर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने रॅलीमध्ये एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर हल्लेखोराला पकडले आणि या हल्ल्याची चौकशी केली असता हल्लेखोराने इम्रान खान लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याने हल्ला केल्याचे त्याने म्हटले.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी काही जण माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा काही दिवसांपूर्वी दावा केला होता. एका टेपमध्ये त्यांनी चार जणांची नावे असल्याचेही सांगितले. त्यांना काही झाले तर ते कट रचणाऱ्यांची नावे उघड करतील, असे सांगितले होते. इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे दावे अनेक वेळा स्वत: इम्रान आणि त्यांच्या पक्षाकडून याआधीही करण्यात आले आहेत. सध्या इम्रान खान यांच्या सुरक्षेत 100 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पोटनिवडणूक : सर्वाधिक 77 टक्के तेलंगणातील मुनूगोडेत, तर अंधेरी पूर्वमध्ये केवळ 31 टक्केच मतदान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -