घरदेश-विदेशपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी बोलावली सर्वपक्षीय परिषद, इम्रान खानना निमंत्रण

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी बोलावली सर्वपक्षीय परिषद, इम्रान खानना निमंत्रण

Subscribe

इस्लामाबाद : आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानच्या पेशावर येथील मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर (Peshawar Mosque Incident) तिथे राजकीय खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी आर्थिक आणि राजकीय संकटावर मात करण्याच्या दृष्टीने उपाय शोधण्यासाठी सर्वपक्षीय परिषद (APC) बोलावली आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Shahbaz Sharif Imran Khan Meet)

माहितीमंत्री मरियम औरंगजेब यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान शरीफ यांना सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना एकत्र आणायचे होते, असे या निवेदनात म्हटले आहे. द न्यूज इंटरनॅशनलमधील वृत्तानुसार, शहबाझ यांनी पीटीआयच्या दोन प्रतिनिधींनाही पेशावरमधील सर्वोच्च समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. येत्या 7 फेब्रुवारी 2023ला इस्लामाबादमध्ये ही परिषद होणार आहे. पेशावरमधील आत्मघाती बॉम्बस्फोट, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे उपाय तसेच पोलीस आणि काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट (CTD) यांच्या अपग्रेडेशनवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

- Advertisement -

फेडरल मंत्री अयाज सादिक यांनी पीटीआयच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मरियम औरंगजेब यांनी दिली. नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष असद कैसर आणि माजी संरक्षणमंत्री परवेज खट्टक यांना आगामी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. या समितीच्या बैठकीत पोलीस, रेंजर्स, गुप्तचर संस्थांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत, असेही मरियम औरंगजेब यांनी सांगितले.

- Advertisement -

इम्रान खान यांना सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटच्या (PDM) नेतृत्वाखालील सरकार आणि पीटीआयमध्ये जवळपास सर्वच राष्ट्रीय मुद्द्यांवर सातत्याने वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इम्रान खान आणि शहबाझ शरीफ यांच्यासोबतच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीत पेशावर हल्ल्याबाबत चर्चा होणार आहे. 30 जानेवारी रोजी पेशावर पोलिस लाइन्स भागातील मशिदीमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान 101 लोक मारले गेले, ज्यात बहुतांश पोलीस अधिकारी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -