इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (PTI) प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तोशखाना प्रकरणात त्यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यासोबतच त्यांची सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
The Islamabad High Court (IHC) on Tuesday suspended PTI Chairman Imran Khan’s three-year sentence in the Toshakhana case.
Detailed judgment is yet to be released.
Read more: https://t.co/wT16K2mBeX pic.twitter.com/Q1kUPX1vtL
— Dawn.com (@dawn_com) August 29, 2023
तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना दोषी ठरवून इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 5 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याचबरोबर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. त्यानुसार इम्रान खान यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. मुख्य न्यायमूर्ती आमीर फारूक आणि न्यायमूर्ती तारिक मेहमूद जहांगिरी यांच्या खंडपीठाने इम्रान खान यांच्या तुरुंगवासाच्या विरोधात केलेल्या अपीलावर सुनावणी करताना हा आदेश दिला.
हेही वाचा – भर सभेत साधूचा फोन वाजताच वरुण गांधी म्हणाले, अरे अडवू नका…
पाकिस्तानच्या कायद्यानुसार परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशखान्यात ठेवावी लागते. इम्रान खान यांच्यासह अनेक बडे नेते तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तोशखान्यात केलेल्या भेटवस्तू स्वस्तात विकत घेऊन जास्त किमतीला विकल्याचे समोर आले होते. याच प्रकरणात गेल्यावर्षी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांची खासदारकी रद्द केली होती. शिवाय, इम्रान खान यांना पाच वर्षं निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली.
हेही वाचा – संभाजीनगरच्या विवाहितेचे दहशतवाद्यांशी संबंध? पाक तरुणासोबत पळून गेल्यानंतर 9 महिन्यांनी समोर आले ‘असे’
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 8.5 कोटी पाकिस्तानी रुपये किमतीचे हिरेजडीत सोन्याचे घड्याळ मिळाले होते. याशिवाय 56 लाख किमतीचे कफलिंक, 15 लाख रुपये किमतीचे पेन आणि 85 लाख रुपये किमतीची अंगठी मिळाली होती. त्या बदल्यात इम्रान खान यांनी केवळ दोन कोटी रुपये जमा केले आणि या सर्व भेटवस्तू आपल्या नावावर करून घेतल्या. त्याने इतर अनेक भेटवस्तू घेताना त्याचे पैसेही दिले नाहीत, असे एका अहवालातून समोर आले होते.