पाकिस्तानात 8 वर्षांत चार हजारांहून अधिक शिया मुस्लिमांची हत्या; अहवालातून धक्कादायक खुलासा

pakistan report says over 4000 shias killed in eight years in pakistan
pakistan report says over 4000 shias killed in eight years in pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या एकाच वेळी अनेक अडचणींचा सामना करत आहे. मुसळधार पुरामुळे पाकिस्तानात एकीकडे हाहाकार उडाला आहे, तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे पाकिस्तानला इतर देशांकडून मदतीची याचना केल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पाकिस्तानमध्ये दररोज जातीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यात गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात 4000 शिया मुस्लिमांच्या हत्या झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. शिया, अहमदी आणि गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांना पाकिस्तानमधील सुन्नी गटांकडून धमकावले जात आहे. तर सुन्नी मुस्लिम गटांना लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये जातीय हिंसाचारात वाढ

कॅनडास्थित थिंक टँक IFFRAS ने सांगितले की, इंटरनॅशनल क्राइसिस ग्रुपने(ICG) 5 सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता आणि आर्थिक मंदीमुळे आगामी काळात सांप्रदायिक हिंसाचार अधिक तीव्र होऊ शकतो. ICG ने आपल्या अहवालात दावा केला की, जातीय दहशतवाद आता सुन्नी इस्लामी गटांच्या मर्यादेत चालतो, ज्यात बहुतेक उदारमतवादी बरेलवी उप-पंथाचे अनुयायांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या लोकसंख्येचा तो फारच लहान भाग आहे असे मानले जाते.

जातीय हिंसाचारात 4,847 शिया मुस्लीमांचा मृत्यू

2020 मध्ये प्रसिद्ध संरक्षण विश्लेषक आयशा सिद्दीका यांनी कराची, सिंध आणि पंजाबच्या इतर शहरी केंद्रांमध्ये सुन्नी आणि शिया यांच्यातील जातीय तणावाबद्दल लिहिले होते. ते म्हणाले की, 2010 ते 2018 दरम्यान पाकिस्तानमध्ये जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे 4,847 शिया मारले गेले. याशिवाय पाकिस्तानात आलेल्या विनाशकारी पुरामुळे इस्लामाबादचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचा सुमारे एक तृतीयांश भाग पुरात बुडाला होता.

पाकिस्तानात शिया मुस्लिम समाज कमजोर

या वर्षी सप्टेंबरपूर्वी प्रकाशित झालेल्या ICG अहवालात असे म्हटले होते की, हे नवीन गट वेगवेगळ्या प्रकारे हे काम करत आहेत, ज्यामुळे आंतरजातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यात अल्पसंख्याक समुदाय, विशेषत: शिया अत्यंत असुरक्षित झाले आहेत.


Video : भाजप आमदारांचं मस्त चाललंय! विधानसभेत एक खातोय गुटखा, तर दुसरा खेळतोय गेम