घरट्रेंडिंगआठवतायत का? चांद नवाब!

आठवतायत का? चांद नवाब!

Subscribe

बजरंगी भाईजानमध्ये नवाझुद्दीन सिद्दकीने हा डायलॉग म्हटला आहे. एका पाकिस्तान पत्रकाराची भूमिका नवाझने साकारली असू ही घटना खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडली आहे. पाकिस्तानचे पत्रकार चांद नवाब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बजरंगी भाईजानमधध्ये हा सीन दिसला होता.

कराची से लोग अपनो मे इद मनाने के लिए… हे वाक्य तुम्हाला आठवतयं का? हा अगदी बरोबर, बजरंगी भाईजानमध्ये नवाझुद्दीन सिद्दकीने हा डायलॉग म्हटला आहे. एका पाकिस्तान पत्रकाराची भूमिका नवाझने साकारली असू ही घटना खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडली आहे. पाकिस्तानचे पत्रकार चांद नवाब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बजरंगी भाईजानमधध्ये हा सीन दिसला होता. पण बजरंगी भाईजानमधल्या या सीननंतर चाँद नवाब सोशल मीडियावर रातोरात फेमस झाले.

- Advertisement -

(सौजन्य- salman khan films)

आता नवा व्हिडिओ होतोय व्हायरल

चाँद नवाब हे नेहमीच त्यांच्या रिर्पोटींगला घेऊन चर्चेत असतात. रिपोर्टिंगच्यावेळी त्यांच्याकडून होणाऱ्या चूका आणि घ्यावे लागणारे टेक यात अनेक विनोद होतात. आता एका पानाच्या दुकानात शूट करत असताना त्यांचा नेमका काय गोंधळ झाला ते बघाच

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे टेक पाहून दुकानातील लोकांना हसू आवरत नाहीए. पण चाँद नवाब मात्र पीटूसी देण्यात गर्क आहे. एकदा त्यांनी सलग काही वाक्य म्हटली पण नेमका त्यांना हवा तसा शेवट झाला नाही. पान बनवणाऱ्याने पान हातात दिलेच नाही. मग काय पुन्हा टेक असा हा टेकचा सिलसिला सुरुच होता. त्यांचा फायनल टेक कधी झाला असेल माहित नाही  पण हा व्हिडिओ तुम्हाला खळखळून हसवेल हे मात्र नक्की!

कोण आहे चाँद नवाब

चाँद नवाब हे पाकिस्तानातील पत्रकार असून ते सध्या ५५ वर्षांचे आहेत. सध्या ते 92 न्यूजमध्ये मध्ये अँकर, रिपोर्टर आहेत. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील काम माहित नाही, पण त्यांनी या आधी त्यांनी अनेक पाकिस्तानी व्यवसायिक नाटक आणि सिनेमातून काम केली आहेत.

चाँद नवाबचे आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यांचे व्हिडओ युट्युबवर टाकले आहेत बघा त्यांचे आणखी काही फनी व्हिडिओज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -