घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटघ्या..पाकिस्तान म्हणतंय, 'कोरोनानं चीनला आमच्या अजून जवळ आणलं!'

घ्या..पाकिस्तान म्हणतंय, ‘कोरोनानं चीनला आमच्या अजून जवळ आणलं!’

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान आणि चीनमधली जवळीक अजून वाढल्याचं प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे.

कोरोनाने आताच पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे. ज्या जागतिक महामारीने भल्याभल्या देशांना हतबल केले आहे, त्या तुलनेत पाकिस्तानची या साथीशी लढण्याची ना आर्थिक ना सामाजिक पातळीवर तयारी आहे. त्यामुळे अखेर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे चीनला हाक मारली. चीननेही तात्काळ हाकेला ओ देत ८ सदस्यीय वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पाकिस्तानला पाठवले. शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर चिनी वैद्यकीय पथकाचे स्वागत केले आणि देशाला या आजारावर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी पाकिस्तानमध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

‘चीन सरकार अपेक्षेप्रमाणे वागले’

पाकिस्तान नेहमीच चीनच्या पाठिशी राहिला आहे, त्यामुळे चीनही कायम पाकिस्तनाच्या सोबत असतो. या (कोविड -१९)
आव्हानाने चीन आणि पाकिस्तानमधील लोकांना आणखी जवळ आणले आहे. या आव्हानात्मक काळामध्ये (पाकिस्तानी)
जनतेकडून चीनने पुढे येण्याची अपेक्षा केली आहे आणि चीनही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागले आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी म्हणाले.

- Advertisement -

पाकिस्तानी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने पाठवलेल्या या पथकात झिनजियांग उयगुर स्वायत्त प्रदेशाच्या आरोग्य आयोगाने निवडलेल्या तज्ञांचा समावेश आहे. साथीवर नियंत्रण, रूग्णांवर उपचार आणि प्रयोगशाळेतील कामांवर सल्लामसलत करणे आणि पाकिस्तानी वैद्यकीय कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणे आणि प्रशिक्षण देणे हे काम हे पथक करणार आहे. या वैद्यकीय पथकाने ११०,००० हून अधिक फेस मास्क, ५००० प्रोटेक्शन सूट, १२ व्हेंटिलेटर आणि इतर औषधे देखील पाकिस्तानमध्ये आणली. हे पथक सुमारे दोन आठवडे पाकिस्तानमध्ये मुक्काम करेल आणि पंजाब आणि सिंध प्रांतांनाही भेट देईल.


Corona:जग कोरोनाशी लढतंय आणि उ.कोरिया मिसाईल डागतंय! कोण समजावणार?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -