Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Wing Commander Abhinandan Vardhaman : पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ...

Wing Commander Abhinandan Vardhaman : पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ व्हायरल

बालाकोट एअरस्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाले असून याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा व्हिडीओ जारी केला आहे. यात अभिनंदन पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडलेला अनुभव सागंताना दिसत आहेत.

Related Story

- Advertisement -

बालाकोट एअरस्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाले असून याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा व्हिडीओ जारी केला आहे. यात अभिनंदन पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडलेला अनुभव सागंताना दिसत आहेत.

- Advertisement -

२६ जानेवारी २०१९ साली पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक केला होता. यात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केले होते. यात शेकडो दहशतवादी ठार झाले होते. मात्र याच  मोहिमेत पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले व कोसळले. मात्र सुदैवाने यात अभिनंदन बचावले पण पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. त्याआधी स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केले. या व्हिडीओतही अभिनंदन तोच अनुभव सांगताना दिसत आहेत.

- Advertisement -