घरदेश-विदेशPakistan Tehreek-e-Insaf : इमरान खानच्या पार्टीला तडा? बंडखोर नवा पक्ष काढणार...

Pakistan Tehreek-e-Insaf : इमरान खानच्या पार्टीला तडा? बंडखोर नवा पक्ष काढणार…

Subscribe

 

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) पार्टीला तडा जाण्याची चर्चा सध्या पाकिस्तानात सुरु आहे. इमरान खान यांना सोडून गेलेले नेते स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची तयारी करत आहेत. लवकरच नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

इमरान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जहांगीर खान तरीन हे बंडखोर नेत्यांचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेत नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन पक्षाचे नाव इश्तेकाम-ए-पाकिस्तान पार्टी असू शकते असे सांगितले जाते. तरीन यांनी नुकतीच इमरान खान यांची साथ सोडली आहे. PTI चे शंभर पेक्षा अधिक नेते, आमदार व खासदार यांनी तरीन यांना पाठिंबा दिला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानात निवडणूक होणार आहे. नवीन पक्षाचे उमेदवार तरीन हे आगामी निवडणुकीत उतरवू शकतात. असे झाले तर इमरान खान यांच्या शिवाय निवडणूक रिंगणात उतरणारा नवीन पक्ष असेल. हा नवीन पक्ष तरीन यांच्या नेतृत्त्वाचाच असेल. महत्त्वाचे म्हणजे तरीन यांना लष्कराचा पाठिंबा आहे. त्यामुळे तरीन यांचा नवीन पक्ष सत्तेतही सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

PTI च्या माजी नेत्या फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले की, या सर्व परिस्थितीला इमारन खान स्वतः जबाबदार आहेत. इमरान खान यांनी लष्कराविरोधी भूमिका घेतल्याने ९ मे २०२३ रोजी पाकिस्तानात हिंसाचार झाला. राजकीय विरोधकांना विरोध करण्याऐवजी इमरान खान यांनी लष्करावर निशाणा साधला. त्याचेच फळ म्हणजे इमरान खान यांचा पक्ष फुटला आहे. PTI चे सर्वच नेते तरीन यांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देत आहेत. कोणीही इमरान खान यांच्यासोबत राहु इच्छित नाही. PTI पक्ष आता भूतकाळात जमा झाला आहे, असा दावा अवान यांनी केला. अवान यादेखील तरीन गटात सामील झाल्या आहेत.

- Advertisement -

इमरान खान यांनी लष्करी विरोधी भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरु झाला. PTI चे नेते आणि समर्थकांनी लष्काराच्या ठिकाणांवर हल्ले केले. लष्काराने या हल्ल्यांना चोख उत्तर देत PTI च्या हल्लेखोरांना कारागृहात डांबले होते. त्यांनतर PTI नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले. बहुतांश PTI नेत्यांनी इमरान खान यांची साथ सोडली आहे.

इमरान खान यांना अटक आणि जामीन

अल कादिर ट्रस्ट (Al Qadir Trust case) प्रकरणात इम्रान खान यांना गेल्या अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये जामीन घेण्यासाठी इम्रान खान हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात आले असताना नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) त्यांना न्यायालयाच्या आवारातून अटक केली होती. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करणे, हे अपमानजनक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. उच्च न्यायालय किंवा अन्य न्यायालयातून आरोपीला अटक करता येत नाही. तुम्ही न्यायालयाचा अनादर करू शकत नाहीत, असे न्यायालयाने एनएबीला सुनावले. याप्रकरणात न्यायालयाने इमरान खान यांना जामीनही मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघेही बॅकफूटवर आले आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -