CoronaEffect: भारतापेक्षाही पुढे पाकिस्तानाचा लॉकडाऊन

pakistan will set a record for taking loans plans to take a 15 billion dollars
पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असताना बहुतांश देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतातही दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला असून हा ३ मेपर्यंत असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा लॉकडाऊन त्याही पुढे सुरू राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ९ मेपर्यंत पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या कॅबिनेटची काल बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला.

हेही वाचा – चिंताजनक: लक्षणं नसलेला रुग्ण पसरवतोय कोरोना

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार इतकी झाली असून कोरोना रुग्णांच्या शोधासाठी रॅपिट टेस्टचा वापर पाकिस्तानी सरकारने सुरू केला आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या शोधाकरता छुप्या पद्धीतने एजन्सी इंटर सर्विसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ची मदतही घेतली जात आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख २५ हजार ९२० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ९१ हजार ०६१ जणांना या आजारामुळ आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा हा अमेरिकेत असून मृत्युंचे प्रमाणही त्यांच देशात जास्त आहेत.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीही केल्याचे सांगण्यात आले होते. पंतप्रधान एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते, ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बाब समोर येताच इम्रान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.