Pakistan : इम्रानच्या समर्थकांनी नव्हे तर सरकारनेच भडकावला हिंसाचार; PTI प्रमुखांचा मोठा आरोप

पाकिस्तानात मागच्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे.

Pakistan The government instigated the violence not Imran s supporters A major allegation by the PTI chief Imran Khan
पाकिस्तानात मागच्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे.

पाकिस्तानात मागच्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे. आपली आणि आपल्या पक्षाची बदनामी करण्यासाठी सरकारी एजन्सीच्या लोकांनी जाळपोळ आणि गोळीबार केल्याचा आरोप इम्रानने केला आहे. पीटीआय प्रमुख म्हणाले की, हे सर्व त्यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या लंडन योजनेचा एक भाग आहे. ( Pakistan The government instigated the violence not Imran s supporters A major allegation by the PTI chief Imran Khan )

इम्रान खान यांच्यावर आरोप

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये इम्रान खान म्हणाले की, ‘आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत की जाळपोळ आणि गोळीबार सरकारी एजन्सीच्या लोकांनी केला होता, त्यांना विनाश घडवायचा होता आणि त्यासाठी पीटीआयला जबाबदार धरायचे होते. जेणेकरून पीटीआय नेत्यांच्या अटकेला हे योग्य दाखवू शकतील. लाहोरमधील सरकारी इमारती आणि कॉर्प्स कमांडरच्या घराला जाळपोळ करण्यामागे सुनियोजित रणनीती असल्याचे इम्रान खान म्हणाले.

इम्रान यांची चौकशीची मागणी

हिंसाचाराच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी इम्रान खान यांनी केली. ते म्हणाले की, ‘हे सर्व लंडन योजनेचा भाग आहे जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्यासह पक्षाच्या नेतृत्वाला तुरुंगात पाठवता येईल’. अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात हिंसाचार सुरू झाला. पहिल्यांदाच पाकिस्तानमधील लष्कराच्या मुख्यालयाला लक्ष्य करून तोडफोड करण्यात आली आणि लाहोरमध्ये एका उच्च लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्याला आग लागली. या हिंसाचारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला. मात्र, गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पीटीआयने केला आहे.

यापूर्वी इम्रान खान यांनी देशद्रोहाचा आरोप करून सरकार आपल्याला 10 वर्षे तुरुंगात ठेवू इच्छित असल्याचा आरोप केला होता. आपल्या पक्षावरही बंदी घालण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचेही इम्रान म्हणाले.

( हेही वाचा: “आप याद बहोत आयेंगे…,” न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांची शेरोशायरी )