Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशPakistan : पाकिस्तानमध्ये रेल्वेचे अपहरण, तब्बल 450 प्रवासी ओलीस

Pakistan : पाकिस्तानमध्ये रेल्वेचे अपहरण, तब्बल 450 प्रवासी ओलीस

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये संपूर्ण ट्रेनचे अपहरण करून यावेळी तब्बल 450 हून अधिक प्रवासांना ओलीस ठेवल्याचे समोर आले आहे. यावेळी बलुच लिबरेशन आर्मीने बोलानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच, जर त्यांच्याविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई सुरू केली तर ते सर्व प्रवाशांना ठार मारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या 6 लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Pakistan Train Hijacking Baloch militants seize Peshawar bound Jaffar Express, hold 450 passengers hostage)

हेही वाचा : Vidhan Parishad Election : भाजपकडून 3 नावे पक्की; माधव भंडारींना निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, अपहरण केलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी दल (ATF) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) चे सक्रिय कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. ते सर्वजण सुट्टीवर पंजाबला (पाकिस्तान) जात होते. जर ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या सैनिकांनी कोणताही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर सर्व ओलिसांची हत्या केली जाईल, असा इशारा बलुच लिबरेशन आर्मीने दिला आहे. या कारवाई दरम्यान बलुच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी महिला, मुले तेच बलुच प्रवाशांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी माहिती दिली की, “क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये पिरोकानारी आणि गदालार दरम्यान जोरदार गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात चौकशी सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. बलुचिस्तान प्रांतीय सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांना ‘आपत्कालीन उपाययोजना’ करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रांतीय सरकारच्या निवेदनानुसार, सिबी रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच, खडकाळ भूभागामुळे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी माहिती दिली की, नऊ डब्यांच्या या ट्रेनमध्ये सुमारे 500 प्रवासी होते. बोगदा क्रमांक 8 जवळ सशस्त्र काही लोकांनी ट्रेन थांबवली. प्रवाशांशी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवेदनात पुढे सांगितले आहे की, रेल्वे विभागाने बचाव कार्यासाठी घटनास्थळी अधिक गाड्या पाठवल्या आहेत. घटनेचे प्रमाण आणि दहशतवादी घटकांची शक्यता तपासली जात आहे.