घरदेश-विदेशपाकिस्तानची क्रूरता; जवानाची हत्या करुन मृतदेहाची केली विटंबना

पाकिस्तानची क्रूरता; जवानाची हत्या करुन मृतदेहाची केली विटंबना

Subscribe

पाकिस्तानची क्रुरता पुन्हा एकदा समोर आली आहे. पाकिस्तानने आणखी एका भारतीय सैन्याची हत्या करुन मृतदेहाची विटंबनवा केली आहे. या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शस्त्रसंधीवर बंदी असताना देखील पाकिस्तानी सैन्यांनी एका भारतीय जवानाची हत्या करत त्याच्या मृतदेहाची विटंबना केली आहे. पाकिस्तानी सैन्यांनी नियंत्रम रेषेजवळ बीएसएफ जवानाची हत्या केली. या घटनेमुळे दोन्ही देशामध्ये तणाव वाढला आहे. जम्मू-काश्मीरच्या रामगड सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जवानांनी नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

जवानाच्या मृतदेहाची विटंबना

बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार यांची पाकिस्तानी सैन्यांनी तीन गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरिराची विटंबना करत त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. सहा तासानंतर नरेंद्र कुमार यांचा मृतदेह भारत-पाकच्या सीमा भागात सापडला. बीएसएफ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुमार सोमवारपासून बेपत्ता होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. पाकिस्तानी सैन्यांनी आधी नरेंद्र कुमार यांना घेऊन गेले. त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेह सीमाभागात आणून टाकला असल्याचे सांगितले जात आहे.

नरेंद्र कुमार होते बेपत्ता

बीएसएफ जवानांना मंगळवारी सकाळी सीमा भागातील गवत कापण्यास सांगण्यात आले होते. या जवानांवर सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर नरेंद्र कुमार हे बेपत्ता झाले. नरेंद्र कुमार यांच्या शोधासाठी बीएसएफकडून सीमा भागात सर्च ऑपरेशन देखील करण्यात आले. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळ सापडला.

- Advertisement -

नियंत्रण रेषेवर हायअलर्ट

शहीद जवान नरेंद्र कुमार हरियाणाच्या सोनीपतचे रहिवासी होते. पाकिस्तानने याआधी देखील जवानांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली आहे. या घटनेला सरकार, परराष्ट्र खाते त्याचसोबत डीजीएमओने गंभीरतेने घेतले आहे. त्याचबरोबर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत जवानांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीएसएफ आणि इतर जवान पाकिस्तानने केलेल्या या कृत्याचे चोख उत्तर देईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -