पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी, अमेरिकेने केला मोठा खुलासा…

पाकिस्तानसोबतच तालिबानने व्यक्त केली चिंता

Pakistans PM Imran Khan accuses on India

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गळचेपी केल्याचा मोठा खुलासा अमेरिकेने केला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात पाकिस्तानचं नाव समोर आलं आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री एँटनी ब्लिंकन यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबतच तालिबानने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. याआधी ट्रम्प प्रशासनाने सर्वात पहिले २०१८ मध्ये पाकिस्ताचा मुद्दा मांडला. त्यानंतर २०२० मध्ये हा मुद्दा असाच राहिला होता. पाकिस्तानला धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर उल्लेख करणे किंवा या सर्व गोष्टी सहन करणे, यासाठी एका यादीमध्ये नाव समोर आलंय.

ब्लिंकनने सांगितलंय की, म्यानमार, चीन, इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रूस, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांवर धार्मिक स्वतंत्र्याबद्दल गंभीर उल्लेख केल्यामुळे त्यांचं नाव यादीमध्ये आलंय. तसेच अनेक गोष्टी सहन करणे. याबाबत देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अल्जीरिया, कोमोरोस, क्यूबा आणि निकारागुआसारख्या देशांमध्ये स्पेशल वॉच लिस्टमध्ये ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा: कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा…विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय


अल-शबाब, बोको हराम, हयात तहरीर, अल-शाम, हौथिस, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सीरिया, इस्लामिक स्टेट-ग्रेटर सहारा, इस्लामिक स्टेट-पश्चिम आफ्रिका, जमात नस्त्र अल-इस्लाम आणि तालिबान या देशांच्या बाबतीत सुद्धा संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सर्वजण सतत सरकारवर दबाव टाकत राहू. आपल्या कायद्यांना स्वातंत्र्यापासून वाचवण्यासाठी नक्की बदल करावेत. तसेच याचं विरोध करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. अशा प्रकारचं वक्तव्य ब्लिंकन यांनी केलं आहे.