घरदेश-विदेशपाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओने पाकमध्ये...

पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले; PM मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओने पाकमध्ये खळबळ

Subscribe

पाकिस्तानचे खासदार आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आझम खान स्वाती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ ट्विट केलाय

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. गरिबीशी झुंज देणाऱ्या पाकिस्तानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका व्हायरल व्हिडीओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत, ‘बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाकिस्तानचा सर्व अहंकार दूर केला. आम्ही त्याला कटोरा घेऊन जगभर फिरायला भाग पाडले,” हा व्हिडीओ शेअर करताना विरोधी पक्ष असलेल्या पीटीआयनं शेहबाज सरकारला धारेवर धरलेय.

पाकिस्तानचे खासदार आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आझम खान स्वाती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ ट्विट केलाय. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘पाहा भारताचे पंतप्रधान मोदी पाकिस्तानबद्दल काय बोलत आहेत. थोडासा आदरही सोडला नाही, तरी हरकत नाही. पाकिस्तानला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इम्रान खान सरकारला परत आणणे.

- Advertisement -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या व्हिडीओवर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलीय. ‘पंतप्रधान मोदी त्यांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये म्हणत आहेत की, त्यांनी पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले, त्यांनी पाकिस्तानला इथपर्यंत आणले, असे ते सांगत आहेत. पाकिस्तानला अशा परिस्थितीत आणण्यासाठी पीएम मोदींनी काय केले ही वेगळी बाब आहे, पण यासाठी पाकिस्तानच अधिक दोषी आहे, त्याबद्दल पाकिस्तानी जनतेलाही वाईट वाटते. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पाकिस्तान इतर देशांकडे मदतीची आस लावून पाहत असतो, असंही ते म्हणालेत.


व्हिडीओ जुना असल्याचे सांगत पत्रकाराने पीटीआयची खिल्ली उडवली
पीएम मोदींचा हा व्हिडीओ शेअर करून इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते पंतप्रधान शेहबाज शरीफ सरकारच्या काळात पाकिस्तानच्या दुरवस्थेची खिल्ली उडवित आहेत. दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार नाइला इनायतने हा व्हिडीओ शेअर केला असून, तो 2019 चा असल्याचे सांगितले जातेय. पीटीआय लोक तो व्हिडिओ शेअर करत आहेत, पण हा व्हिडीओ 2019 चा आहे आणि तेव्हा इम्रान खान पंतप्रधान होते.’ ‘जेव्हा शत्रू चेष्टा करतो आणि मान देत नाही, तर जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे, असंही हा व्हिडीओ शेअर करताना पत्रकार इर्शाद भाटी यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचाः भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट, काश्मीरमध्ये पायी चालण्यावर निर्बंध

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -