घरदेश-विदेशपाकिस्तानचे लवकरच तुकडे-तुकडे, ...तर भारत पीओके ताब्यात घेईल - मुक्तदर खान

पाकिस्तानचे लवकरच तुकडे-तुकडे, …तर भारत पीओके ताब्यात घेईल – मुक्तदर खान

Subscribe

Pakistan Crises | पाकिस्तानातील अनेक निर्वासित पाकिस्तानातून निघून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतील. भारतावर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. 

Pakistan Crises | इस्लामाबाद – पाकिस्तानात संकटांचा डोंगर कोसळला आहे. परदेशी मदत उपलब्ध होत असली तरीही देशाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या देशाची परिस्थिती कधी सुधारेल याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. असं असतानाच पाकिस्तानात ही परिस्थिती अशीच राहिली तर यावर्षी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या डेलावेअर विद्यापीठातील इस्लामिक अभ्यास विभागाचे संस्थापक संचालक (Founding Director of Islamic Studies Programme of Delaware University) प्रा. मुक्तदर खान (Prof. Muktadar Khan) यांनी हा दावा केला आहे.

हेही वाचा – गव्हाच्या पिठासाठी रडणाऱ्या पाककडे आहे सोन्याची खाण; अर्थव्यवस्थेला मिळू शकते उभारी

- Advertisement -

मुक्तदर खान म्हणाले की, “पाकिस्तानवर सहा प्रकाराचे संकट घोंगावत आहे. ज्यामुळे पाकिस्तानचे लवकरच तुकडे होऊ शकतील. या काळात जर भारताने युद्ध पुकारले तर भारत काश्मीर सहज ताब्यात घेऊ शकतो. तसंच, इतर क्षेत्रावरही भारत कब्जा करू शकतो.” एक व्हिडीओ जारी करत मुक्तदर खान यांनी हा दावा केला आहे.

राजकीय संकट, आर्थिक संकट, सुरक्षा संकट, सिस्टम संकट, ओळख संकट आणि पर्यावरण संकट अशा सहा प्रकारच्या संकटात पाकिस्तान अडकला आहे. या संकटातून नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर पाकिस्तानचे २०२३ मध्ये तुकडे होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर देशातील सर्व सरकारी यंत्रणाही अयशस्वी ठरू शकतील, असं मुक्तदर खान म्हणाले.  जर, असं झालं तर पाकिस्तानातील अनेक निर्वासित पाकिस्तानातून निघून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतील. भारतावर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले; PM मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओने पाकमध्ये खळबळ

पाकिस्तानात राजकीय फुटबॉल स्पर्धा

“इमरान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर पाकिस्तानात राजकीय संकट निर्माण झालं. मोर्चे, आंदोलन, सभा घेऊन इमरान खान यांनी देशात तमाशा निर्माण केला आहे. या राजकीय संकटामुळे सरकार व्यवस्थित चालू शकत नाहीय. त्यामुळे सरकारला काम करणं कठीण झालं आहे. पाकिस्तानी सरकार तर अर्धा वेळ इमरान खान यांच्यासोबत राजकीय फुटबॉल खेळत आहे. त्यांना सरकार चालवायला कुठे वेळ आहे?” असा सवालही मुक्तदर खान यांनी उपस्थित केला आहे.

पाकिस्तानकडील परकीय चलन संपले

“पाकिस्तानात महागाई वाढली आहे. पाकिस्तानचा विकासदर खालावला आहे. निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात आर्थिक संकट वाढलं आहे. पाकिस्तानला जर परदेशातून काही वस्तू खरेदी करायच्या असतली तरी ते करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडील परदेशी चलनही संपत आले आहे. जर ते डिफॉल्ट झाले तर त्यांची क्रेडिट रेटिंग संपून जाईल आणि त्यांना कुठूनही कर्ज उपलब्ध होणार नाही. डिफॉल्टपासून रिकव्हर व्हायला जवळपास १०-२० वर्षे लागतात,” असं मुक्तदर खान यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – पाकिस्तानात खाद्यसंकट तीव्र, कराची बंदरावर अडकले गव्हाचे कंटेनर

“पाकिस्तान सध्या दोन लढाया लढत आहे. अफगानिस्तानातील तलिबानांविरोधात पाकिस्तानची लढाई सुरू असून सीमेवरही तणाव निर्माण झाला आहे. तहरीक-ए-तालिबानने (TTP) पाकिस्तानात अवैध सरकार घोषित केले आहे. यामुळे पाकिस्तानात सध्या दोन सरकार देश चालवत आहेत. त्यामुळे अफगानिस्तानची या देशावर दहशत निर्माण झाली आहे,” असं मुक्तदर खान म्हणाले.

…तर भारत पीओके कब्जा करेल

ते पुढे म्हणाले की, “एका अर्थाने पाकिस्तानचं नशीब चांगलं आहे. कारण, पाकिस्तान ज्याप्रमाणे विचार करतं त्याप्रमाणे भारत विचार करत नाही. भारतानेही पाकिस्तानप्रमाणे विचार करायला सुरुवात केली तर सीमेवर युद्ध होऊ शकतं. ज्यामुळे भारत त्याला पाहिजे ते क्षेत्र काबिज करू शकेल. पाकिस्तानचे निम्मे लष्कर तालिबानविरोधात लढत आहे. त्यामुळे भारताविरोधात लढण्याकरता पाकिस्तानकडे फक्त निम्मे लष्करच शिल्लक आहे. पाकिस्तानच्या या नाजूक परिस्थितीचा फायदा भारताने घेतल्यास ते पीओकेवर ताबा मिळवू शकतात.”

पाकिस्तानात तिहेरी सरकार

पाकिस्तान सरकारच्या प्रणालीतही तणाव निर्माण झाला आहे. सरकारमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. पाकिस्तानात लोकशाहीचं सरकार आहे, लष्कराचंही सरकार आहे आणि टीटीपीचंही सरकार आहे. या तिहेरी सरकार यंत्रणांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पाकिस्तानातील हे सिस्टम संकट हटवायचं असेल तर त्यांना प्रत्येक राज्यांचं पुन्हा गठण करावं लागणार आहे. पाकिस्तानला अशाप्रकारे राज्यांचं गठण करावं लागेल जिथं पाकिस्तानी सरकारचं नियंत्रण आहे.

हेही वाचा – गव्हाच्या पिठावरून पाकिस्तान गृहयुद्धाच्या तोंडावर!

…तर शरिया कायदा लागू होईल

पाकिस्तानात दोन प्रकराचे गट निर्माण झाले आहेत. एका गटाला देशात लोकशाही नांदावी असं वाटतंय. लोकशाहीच्या माध्यमातून सरकार स्थापन व्हावं, असं वाटतंय. अशा सरकारमध्ये विचार करण्याचं स्वातंत्र असले, कोणताही धर्म आणि संस्कृती मानण्याचं स्वातंत्र्य असले, अशी विचारधारा असलेलं सरकार एका गटाला हवंय. मात्र, दुसऱ्या गटाला शरिया कायदा लागू व्हावा असं वाटत आहे. जर, टीटीपीने पाकिस्तानवर पूर्णतः कब्जा मिळवला तर शरीया कायदा लागू होऊ शकतो. यानुसार, सर्व महिलांना कामावरून काढून टाकलं जाईल, मुलींचं शिक्षण बंद करण्यात येईल, अशी भीतीही मुक्तदर खान यांनी व्यक्त केली.

नैसर्गिक आपत्तीनेही पाकिस्तान बेहाल

पाकिस्तानात एका बाजूला मानवनिर्मित संकट निर्माण झालेलं असताना हा देश नैसर्गिक संकटांशीही सामना करत आहे. पाकिस्तानात सातत्याने पूर, भूंकप, वादळे येत असल्याने देशाची अवस्था बिकट बनत चालली आहे. यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे २०२३ हे वर्ष अत्यंत बिकट असणार आहे, असंही मुक्तदर खान म्हणाले.

हेही वाचा – पाकिस्तानने विकायला काढली अमेरिकेतील दूतावासाची इमारत? बोली लावणाऱ्या तिघांत एक भारतीय!

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -