घरक्राइमगुजरातच्या समुद्रात आढळली पाकिस्तानी बोट; 300 कोटींच्या ड्रग्जसह 10 पाक नागरिकांना अटक

गुजरातच्या समुद्रात आढळली पाकिस्तानी बोट; 300 कोटींच्या ड्रग्जसह 10 पाक नागरिकांना अटक

Subscribe

गुजरातच्या समुद्रात पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांनी आणि ड्रग्जने भरलेल्या पाकिस्तानी बोटीवर भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. यासोबत 10 पाकिस्तानी नागरिकांनीही अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसच्या गुप्त माहितीच्या आधारेभारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना तटरक्षक दलाने सांगितले की, गुजरात एटीएसने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट अडवण्यात आली, या बोटीमध्ये 10 पाक क्रू मेंबर्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि 40 किलो ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे.


गुप्त माहितीच्या आधारे 25-26 डिसेंबरच्या मध्यरात्री पाक बोटीला अडवण्यासाठी एक विशेष ऑपरेशन चालवण्यात आले, या ऑपरेशनच्या दरम्यान भारतीय तटरक्षक दलाने त्यांचे जहाज ICGS अरिंजय पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ (IMBL) तैनात केले होते.

- Advertisement -

यावेळी पाक भारत सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दलाने अल सोहेली या पाकिस्तानी मासेमारीची बोट अडवली आणि चौकशी केली. यावेळी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी पाक बोटीची झडती घेत त्यामधून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि सुमारे 40 किलो अमली पदार्थांचा साठा जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची अंदाजे किंमत 300 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी पाक बोटीसह पाक खलाशीलाही ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पुढील तपास, आणि चौकशीसाठी पाक बोटीतील 10 लोकांना आणि बोटीला ओखा येथे आणण्यात येत आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -