Pakistan: धक्कादायक घटना! PUBG खेळण्यास नकार दिल्यामुळे आईसह दोन बहिणींची निर्घृण हत्या

तरूणांमधील पब्जी गेमचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाहीये. दिवसागणिक अशा प्रकारच्या घटना रोज वाढताना दिसत आहेत. पब्जी खेळण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलाने आपल्या आईसह दोन बहिणींची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पंजाब प्रांतात घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची चौकशी केली.

मागील आठवड्यात लाहोरच्या काहना परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोग्य कर्मचारी महिला नाहिद मुबारक (४५), तैमुर (२२) तसेच (१७) आणि (११) वर्षीय दोन बहिणींचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. अल्पवयीन मुलगा हा पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने आईसह भाई आणि दोन बहिणींची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाला असल्यामुळे त्याचे वागणे मनोरूग्णा प्रमाणे झाले होते. नाहिदा मुबारक यांचा तलाक झाल्यानंतर दिवसभर मुलगा गेम खेळत असल्यामुळे त्या मुलावर रागवत होत्या. घटनेच्या दिवशीही त्या मुलावर संतापल्या होत्या. परंतु मुलाने संतापाच्या भरात घरातील कापाटात असलेली पिस्तुल काढून कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी मुलाने गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलगा आणि पिस्तुल ताब्यात घेतलं. यावेळी या घटनेबाबत पुढील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेमिंगमधून घडलेल्या गुन्ह्याचं लाहोरमधील हे चौथं प्रकरण असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता, ९ प्रभागांची वाढ निश्चित