घरताज्या घडामोडीपाकिस्तानी क्रिकेटर झाला निर्वस्र, फिटनेस टेस्टमध्ये झाला फेल

पाकिस्तानी क्रिकेटर झाला निर्वस्र, फिटनेस टेस्टमध्ये झाला फेल

Subscribe

पाकिस्तानी क्रिेकेटर उमर अकमलच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात टीममध्ये प्रवेशासाठी धडपडणाऱ्या उमर अकमलला नॅशनल क्रिकेट अकॅडमीने फिटनेस चाचणीत फेल केलं. यामुळे संतप्त झालेला उमर ट्रेनरसमोरच निर्वस्त्र झाला आणि त्यानंतर मी कुठे जाड झालोय असा सवाल त्याने केलाय. उमरचा कपडे काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्या या वर्तनामुळे पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड त्याच्यावर भलतेच नाराज झाले आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. सरफराज अहमदला कॅप्टनपदावरून हटवण्यात आले असून त्या्च्या जागी नवीन खेळाडूला संधी देण्यात येणार आहे. तर जुन्या खेळाडूंना आराम करण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी क्रिकेट टीमने विशेष कामगिरी न केल्याने क्रिकेट व्यवस्थापन नाराज आहे. त्यातच कोच मुस्बाह उल हक नवीन खेळाजूंना संधी देण्याच्या पक्षात आहे. त्यामुळे पाकिस्तानचा स्टार विकेटकिपर उमर अकमलने कपडे काढून स्वताच्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -