घरताज्या घडामोडीपाकिस्तानी नौदलाचा भारतीय बोटीवर गोळीबार; एका मच्छिमाराचा मृत्यू

पाकिस्तानी नौदलाचा भारतीय बोटीवर गोळीबार; एका मच्छिमाराचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या द्वारका येथील समुद्र भागातील भारतीय बोटीवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, पाकिस्तान नौदलाने ज्या भारतीय बोटीवर गोळीबार केला, तिचे नाव ‘जलपरी’ होते. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच जो व्यक्ती जखमी झाला आहे, त्याला द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळेस पाकिस्तानच्या नौदलाने हल्ला केला, त्यावेळेस जलपरी बोट भारतीय सीमेवर होती.

- Advertisement -

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गुजरातच्या समुद्र भागातील समुद्र सीमेजवळ पाकिस्तानी नौदलाने दोन बोटीवर गोळीबार केला होता. यावेळेस बोटीवर ८ लोकं प्रवास करत होते. या गोळीबारात उत्तर प्रदेशचा राहणार एक व्यक्ती जखमी झाला होता. या दोन्ही बोटी द्वारकामधील समुद्री भागात होत्या. द्वारकाचे एसपी म्हणाले होते की, ‘कदाचित बोटींनी समुद्र सीमा पार केली होती. त्यानंतर पाकिस्तानी नौदलाने त्यांच्यावर गोळीबार केली होती.’ याबाबत मच्छिमारांनी त्यांच्या रेडिओ सेटवरून भारतीय तटरक्षक दलाला माहिती दिली होती. यानंतर भारताने या पाकिस्तानी समकक्षांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तानी नौदलाने दोन्ही बोटी पकडल्याचे पुष्टी केली. त्यानंतर बोटी भारतात परतल्या होत्या.


हेही वाचा – सेल्फीने घेतला जीव, १०० फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -