घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; पाकच्या दोन सैनिकांचा मृत्यू

अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; पाकच्या दोन सैनिकांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तान-अफगाणिस्तान (Pakistan-Afghanistan) सीमेवरील बाजौर लष्करी चौकीवर रविवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोन पाकिस्तान सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आयएसपीआर (ISPR)च्या माहितीनुसार, अफगाणिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तान न्यूज वेबसाईट ARY न्यूजला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ARY न्यूजने ISPRच्या हवाल्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांकडून बाजौरमधील लष्करी चौकीवर गोळीबार गेला. ज्यामध्ये पाकिस्तानाचे दोन सैनिक शहीद झाले आहेत.

ISPRच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सीमेवरून केलेल्या हल्ल्यात दोन पाकिस्तान शिपाई जमाल (वय २८) आणि अयाज (वय २१) यांचा मृत्यू झाला आहे. शिपाई जमाल पाकिस्तानच्या मरदान भागात राहणार होता, तर अयाजचा संबंध चित्रालसोबत होता. या हल्ल्यात पाकिस्तान सैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रत्युत्तर दरम्यान दोन ते तीन दहशतवाद्यांचा मृत्यू आणि इतकेच जखमी झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान तालिबानने अफगाणिस्तान कब्जा केल्यापासून तिथली परिस्थिती कठीण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानची राजधानी काबूल विमानतळावर हल्ले होत आहेत. काल, रविवारी काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी काबूलमध्ये पुन्हा रॉकेट हल्ला झाला.


हेही वाचा – Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -