पाकिस्तानच्या विद्यार्थ्याकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी?, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

गंभीरने दाखल केली तक्रार?

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा किंवा आरोपीचा मेल पोलिसांच्या हाती लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, गौतम गंभीरला पाकिस्तानच्या एका विद्यार्थ्याने ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली होती. गंभीरला दोन मेल करण्यात आले होते. ज्यामध्ये एक मेल धमकीचं आहे. या दोन्ही धमक्या गंभीरला इसीस काश्मीरमधून देण्यात आल्या होत्या . गंभीरला धमकी दिल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गंभीरला धमकी पाकिस्तानच्या एका शहरामधून देण्यात आली होती. हा मेल शाहिद हमिद नावाच्या एका अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला होता. त्याचं निवासस्थान कराची असल्याचं सांगितलं जातंय. या तरूणाचं वय २० ते २५ वर्षाच्या मध्यांतरी आहे. तसेच तो सिंध विद्यापीठाचा विद्यार्थ्यी असल्याचं सांगितलं जात आहे.

काय लिहिलंय मेलमध्ये ?

आम्ही तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू असं पहिल्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर दुसऱ्या ई-मेलमध्ये घराच्या बाहेरील व्हिडिओ सुद्धा पाठवण्यात आला होता. तसेच आम्ही तुला जीवे मारणार होतो. पण काल तू वाचलास. जर तू आपल्या जीवनावर आणि कुटुंबियांवर प्रेम करत असशील तर राजकारण आणि काश्मीरच्या मुद्द्यापासून दूर रहा, अशा प्रकारचा ई-मेल गंभीरला पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

धमकी कशासाठी?

पोलिसांना या धमकीमागील खरं कारण अद्यापही मिळालेलं नाहीये. हा व्हिडिओ यू्टयूबच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे. जो २०२० मध्ये गंभीरच्या एका समर्थकाने अपलोड केला होता. पुढील माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय गुप्त यंत्रणेचाही वापर केला जाणार आहे.

गंभीरने दाखल केली तक्रार?

गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे, असे श्वेता यांनी सांगितले.


हेही वाचा: Survey On Digital Currency : क्रिप्टोकरन्सीची देशभरात चर्चा, किती भारतीयांचा आहे विश्वास?