घरताज्या घडामोडीपाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सीमेवर फेकला टिफीन बॉम्ब

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सीमेवर फेकला टिफीन बॉम्ब

Subscribe

IED बॉम्बला २ किलोचे RDX लावण्यात आले होते. या बॉम्बमुळे मोठे नुकसान झाले असते.

संपूर्ण देशात ७५व्या स्वातंत्र दिनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे देशात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. रविवारी संध्याकाळी पंजाबच्या अमृतसरमध्ये भारत पकिस्तान बॉर्डरवर पाकिस्तानच्या ड्रोनचा पर्दाफाश करण्यात आला. (Pakistani terrorists drop tiffin bomb on Amritsar border)  पाकिस्तानकडून संशयास्पद वस्तू फेकल्या जाणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी मिळाली. लहान मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये IED बॉम्ब फिट करण्यात आला होता. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या डाळीके गावातून आयईडी बॉम्ब आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हा शस्रास्र साठा पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आला होता. जप्त केलेल्या शस्रास्रामध्ये ५ हॅड ग्रेनेट, १००९ मिमी काडतुसे आणि टिफीन बॉक्स एका बॅगमधून पाठवण्यात आले होते, अशी माहिती पंजाबचे DGP दिनकर गुप्ता यांनी दिली.

- Advertisement -

DGP दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, IED बॉम्बला २ किलोचे RDX लावण्यात आले होते. या बॉम्बमुळे मोठे नुकसान झाले असते. स्विचद्वारे हा टाइम बॉम्ब तयार करण्यात आला होता. मॅग्नेटद्वारे तयार करण्यात आलेला हा बॉम्ब मिसहँडलिंग करताच फुटण्याची शक्यता होती. फोनद्वारे देखील हा बॉम्ब ऑपरेट केला जाऊ शकत होता. ३ डेटोनेटर आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. टिफीन बॉक्सद्वारे कोणतेही गर्दीचे ठिकाण टार्गेट करण्याची तयारी होती.

या कटात खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिस आणि इतर खलिस्तान गटांचा यात समावेश असल्याचे नाकारता येत नाही असे दिनकर गुप्ता यांनी म्हटले. पंजाबचे मुख्यमंत्री देखील त्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता आहे.पंजाब राज्याला सध्या हाय अलर्ट देण्यात आला असून पंजाबमधीस पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एनएसजी टीमला बोलावून सध्या या प्रकरणाचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तानात टाईट कपडे घातल्याने तालिबान्यांकडून तरुणीची गोळ्या घालून हत्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -