घरCORONA UPDATEपायही झाका, कोरोना कुठूनही येऊ शकतो- पाकिस्तानी मंत्र्याचे अजब विधान

पायही झाका, कोरोना कुठूनही येऊ शकतो- पाकिस्तानी मंत्र्याचे अजब विधान

Subscribe

जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून चीन, इराण, इटली, स्पेन, अमेरिका, भारतासह पाकिस्तान व इतर अनेक देशांना या व्हायरसने विळखा घातला आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्री डॉ (Firdous Ashiq Awan) फिरदौस आशिक अवान यांनी एक अजब विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी टि्वटरवर शेअर केला आहे. त्याखाली नायला यांनी एक भन्नाट कॅप्शन दिली आहे. फिरदौस यांच्या म्हणण्यानुसार ‘व्हायरस खालूनही येऊ शकतो’ असे यात लिहण्यात आले आहे. फिरदौस यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. तर काहीजणांनी फिरदौस यांचे अगाध ज्ञान बघून धक्का बसल्याचे म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये फिरदौस या कोरोनापासून बचाव करण्यासाठी हाताचे व पायांचेही रक्षण करायले हवे. कारण फक्त तोंडावर मास्क लावून आपण चेहराच सुरक्षित ठेवू शकतो. मात्र कोरोना खालूनही येऊ शकतो. आपण याचाही विचार करायला हवा. हे पण एक वैद्यकिय शास्त्र आहे. यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करावे लागेल असे फिरदौस या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

- Advertisement -

नायला यांनी १८ एप्रिलला हा व्हिडीओ टि्वटरवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत ८० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ हजाराहून अधिक लाईक्स व हजाराहून अधिकवेळा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. टि्वटरवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ८, ३४८ कोरोनाग्रस्त आहेत. यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम फिरदौस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -