घरताज्या घडामोडी'कथाविरहित व्हिडीओ गेमपेक्षा...', शाहरुखच्या 'पठाण'वर पाकिस्तानी लेखकाची टीका

‘कथाविरहित व्हिडीओ गेमपेक्षा…’, शाहरुखच्या ‘पठाण’वर पाकिस्तानी लेखकाची टीका

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने आतापर्यंत १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'पठाण' हा 2023 सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने आतापर्यंत १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘पठाण’ हा 2023 सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे. असे असताना मात्र एका पाकिस्तानी लेखकाने या चित्रपटावर टीका केली आहे. (Pakistani Writer Yasir Hussain Criticizes Shahrukh Khan Film Pathan)

पाकिस्तानी लेखक यासिन हुसैन यांनी ‘पठाण’ चित्रपटावर टीका केली आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल १ देखील पाहिला असेल, तर शाहरुख खानचा पठाण हा एका कथाविरहित व्हिडिओ गेमपेक्षा अधिक काही दिसत नाही”

- Advertisement -

दरम्यान, चित्रपटगृहात कोटींची कमाई केल्यानंतर, पठाण हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमने नकारात्मक भूमिका साकारली आहे.

कोण आहे लेखक यासिर हुसैन?

- Advertisement -

यासिर हुसेन हा एक पाकिस्तानी पटकथा लेखक आहे. जो त्याच्या अनेक कॉमिक भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने ‘आफ्टर द मून’ हा शो होस्ट केला आहे. याशिवाय २०१८ साली यासिरने केलेल्या बंदी या सामाजिक नाटकातील नकारात्मक भूमिकेनंतर तो चर्चेत आला होता.


हेही वाचा – आई कुठे काय करतेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, पितृशोकानंतर आज आईचं निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -