Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशShahbaz Sharif : पंतप्रधान शाहबाज यांचे भारताबाबत विधान, पाकिस्तानच्या लोकांनीच केले ट्रोल

Shahbaz Sharif : पंतप्रधान शाहबाज यांचे भारताबाबत विधान, पाकिस्तानच्या लोकांनीच केले ट्रोल

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अनेकदा मोठी विधाने करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एका सभेत दावा केला की, पाकिस्तान अर्थव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीत भारताला मागे टाकू शकला नाही, तर ते त्यांचे नाव बदलतील. शाहबाज शरीफ यांच्या या वक्तव्यावर आता पाकिस्तानचे लोकच त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अनेकदा मोठी विधाने करण्यासाठी ओळखले जातात. निवडणूक सभांमधील भाषणांमध्ये बोलताना ते आपल्या बोलण्यावरील ताबा अनेकदा गमावताना पाहायला मिळाले आहे.  शाहबाज शरीफ यांनी आता एका सभेत दावा केला की, पाकिस्तान अर्थव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीत भारताला मागे टाकू शकला नाही, तर ते त्यांचे नाव बदलतील. शाहबाज शरीफ यांच्या या वक्तव्यावर आता पाकिस्तानचे लोकच त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. (Pakistanis troll Shahbaz Sharif for saying he will not only surpass India in economy but also change its name)

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान येथे नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान शाहबाज शरीफ यांची एक जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पाकिस्तानी लोकांना आश्वासन दिले की त्यांचे सरकार सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. तसेच पाकिस्तानची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करू. देवाने नेहमीच पाकिस्तानवर कृपा केली आहे. त्यामुळे आमच्या प्रयत्नांमुळे जर पाकिस्तान अर्थव्यवस्था, विकास आणि प्रगतीच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेला नाही तर माझे नाव मी बदलेल, असे वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी केले.

हेही वाचा – Sajjan Kumar : सज्जन कुमार यांना जन्मठेप होण्याचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर

शाहबाज शरीफ यांनी त्यांचे मोठे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची शपथ घेत म्हटले की, मी नवाज शरीफ यांचा चाहता आणि त्यांचा अनुयायी आहे. आज मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की, जोपर्यंत माझ्यामध्ये इच्छाशक्ती आहे, तोपर्यंत आपण सर्वजण पाकिस्तानला पुढे नेण्यासाठी आणि भारताला पराभूत करण्यासाठी एकत्र काम करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण पाकिस्तानचे लोक शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यात अतिशयोक्ती असल्याचे म्हणत आहेत. तर अनेकांनी त्यांच्यावर ठोस पुराव्यांशिवाय मोठी आश्वासने दिल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरील अनेक युझर्संनी पाकिस्तानी पंतप्रधानांची खिल्लीही उडवली आहे.

हेही वाचा – IND Vs PAK : पाकिस्तानी मीडिया सरभरली, म्हणे काळी जादू केली अन् –