घर देश-विदेश Pakistan’s Economic Crisis : पैसे नसल्याने सरकारी विमान सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर

Pakistan’s Economic Crisis : पैसे नसल्याने सरकारी विमान सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर

Subscribe

इस्लामाबाद : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तानची परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. महागाईने होरपळत असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या पीठ, तांदूळ आणि तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तर वाढत्या विजेच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानची तिजोरी रिकामी होत चालली आहे, परकीय गंगाजळी आटत चालली असल्याने निर्यातीवर निर्बंध आले आहेत. इतर देशांकडून मिळालेल्या कर्जाच्या मदतीने तो खर्च भागवत आहे. आता तर, सरकारी विमानसेवाही चालवायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती पाकिस्तानवर ओढावली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानची सरकारी विमान एअरलाइन्स कंपनी असलेल्या पीआयएचे (PIA) खाते गोठवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पीआयए कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगारही मिळालेला नाही. पीआयए सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. निधीच नसल्याने अनेक विमाने धावपट्टीवर धूळखात उभी असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विमान कंपनीचे कामकाजही ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डबा जड जातोय; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

- Advertisement -

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीआयएला फ्लाइट ऑपरेशन्स सुरू ठेवण्यासाठी तातडीने निधीची गरज आहे. त्वरित निधी उपलब्ध करून दिला नाही तर 15 विमाने विमानतळावर तशीच उभी करून ठेवावी लागतील. परंतु पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारकडे पीआयएला देण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने विमान कंपनीला निधी देण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानच्या विमान वाहतूक मंत्रालयाने सरकारला एक कडक इशारा दिला आहे, ज्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या बोईंग आणि एअरबसचे कर्ज, विमानाची भाडेपट्टी तसेच इंधन पुरवठादार आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांची थकबाकी अदा न केल्यास सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पीआयएची सेवा बंद होऊ शकते, असेही माध्यमांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा

अरब न्यूज दिलेल्या वृत्तानुसार, 2020नंतर पीआयएच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यावेळी कोरोना महामारीमुळे विमान वाहतूक सेवा ठप्प होती. मे 2020मध्ये पाकिस्तानी एअरलाइनने पुन्हा सेवा सुरू केल्यानंतर, कराचीमध्ये पीआयए विमानाचा अपघात झाला आणि त्यात 99 पैकी 97 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानी विमान कंपनीच्या विमानातील यंत्र खराब असल्याचे सांगण्यात आले होते.

- Advertisment -