पाकिस्तानमधील जिन्ना यांचा पुतळा बॉम्बने उडवला, बलूच फ्रंटने घेतली जबाबदारी

Pakistan's founder Jinnah's statue destroyed in blast in Balochistan
पाकिस्तानमधील जिन्ना यांचा पुतळा बॉम्बने उडवला, बलूच फ्रंटने घेतली जबाबदारी

पाकिस्तानमधील (Pakistan) ग्वादर (Gwadar) येथे असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या पुतळा रविवारी एका बॉम्ब हल्ल्याने उडवला (Muhammad Ali Jinnah statue destroyed in blast). पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या बलूच लिबरेशन फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान हे शहर पाकिस्तानसोबत चीनसाठी देखील महत्त्वाचे आहे. यावर्षीच्या सुरुवातील जिन्ना यांचा पुतळा मरीन ड्रायव्हवर उभा केला होता. पाकिस्तान हे एक सुरक्षित क्षेत्र मानले जाते.

डॉनच्या अधिकृत सुत्रांच्या हवाले म्हटले आहे की, पुतळ्याच्या खाली एक बॉम्ब ठेवून पुतळा उडवला आहे. यामुळे पुतळा पूर्णपणे नष्ट झाला आहे. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये बंदी घातलेली संघटना बलोच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बबगर बलोच यांनी ट्वीटवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बीबीसी उर्दूने ग्वादर उपायुक्त मेजर (सेवानिवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या माहितीनुसार, या घटनेची उच्चस्तरावर तपासणी केली जाईल. ते म्हणाले की, ‘पर्यटकाच्या रुपात या श्रेत्रात घुसून जिन्ना यांच्या पुतळ्याच्या खाली बॉम्ब ठेवण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही आहे. परंतु एका-दोघांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणाची चारही बाजूंनी चौकशी केली जात असून लवकरच दोषींना अटक केली जाईल.’

दरम्यान १९१३ पासून १४ ऑगस्ट १९४७, पाकिस्तानच्या स्थापनेपर्यंत ऑल इंडिया मुस्लिम लीगचे जिन्ना नेता होते. त्यानंतर १९४८ साली त्यांचे निधन झाले. जिन्ना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल राहिले आहेत.


हेही वाचा – Afghanistan: दाढी कापण्यावर तालिबानने घातली बंदी; सलूनच्या बाहेर लावली नोटीस