घरक्रीडाT20 WC ind vs pak : पाकिस्तानच्या गृहमंत्र्याचा आनंद गगनात मावेना ;...

T20 WC ind vs pak : पाकिस्तानच्या गृहमंत्र्याचा आनंद गगनात मावेना ; आनंदाच्या भरात भारतीय मुस्लीमांबाबत केलं ‘हे’ वक्तव्य

Subscribe

गृहमंत्री शेख रशीद यांनी व्हिडिओ संदेश सोशल मिडियावर शेअर केला.

क्रिकेट विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला विजय मिळाल्यावर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांचा आनंद गगनात मावत नाही आहे.या आनंदाच्या भरात ते विचित्र वक्तव्य करत आहेत. T२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीच्या सामन्यात रविवारी पाकिस्तानने टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला. आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानी संघ भारतासमोर प्रत्येक वेळी पराभूत होत होता, मात्र दुबईत झालेल्या या सामन्याने इतिहासच बदलून टाकला. गृहमंत्री शेख रशीद याबद्दल आनंदाने वेडे झाले आहेत. विश्वचषकात भारताविरुद्धच्या पहिल्या विजयावर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी व्हिडिओ संदेश सोशल मिडियावर शेअर केला आहे. या संदेशात भारतीय मुस्लिमांचा उल्लेख करत त्यांनी भारतातील मुस्लिमांच्या भावनाही पाकिस्तानी संघासोबत असल्याचे म्हटले आहे. राशिदने एक मिनिट ११ सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करून आपल्या संघाचे अभिनंदन केले आणि भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

 

शेख रशीद म्हणाले, ‘मी पाकिस्तानच्या जनतेचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करतो. संघाने ज्या प्रकारे पराभव केला त्याला मी सलाम करतो. आज पाकिस्तानने आपली पोलादी सिद्ध केली आहे. मला खेद आहे की हा पहिला भारत-पाकिस्तान सामना आहे, जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर खेळू शकलो नाही. पाकिस्तानच्या संघाला आणि समुदायाला विजयाच्या शुभेच्छा. आज आमची फायनल होती. भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या.

- Advertisement -

 अन्’इम्रानने’ शेख रशीद यांना सामना पाहू दिला नाही…

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यूएईला पोहोचले होते, परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत बोलावले. पाकिस्तानातील सध्याच्या सुरक्षेची परिस्थिती हाताळण्यासाठी राशिदला बोलावण्यात आल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. खरंतर, पाकिस्तानमधील कट्टरपंथी गट तहरीर-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) ने आपला प्रमुख हाफिज हुसैन रिझवीच्या नजरकैदेविरोधात इस्लामाबादमध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेख रशीद यांना देशात परत बोलावण्यात आले.

 

विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तान भारताविरुद्ध विजयी ठरला

भारताचा डाव २० षटकात ७ बाद १५१ धावांवर आटोपल्यानंतर पाकिस्तानने १८ षटकात १० गडी राखून या धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज बाबर आणि रिझवान यांनीच भारताची धावसंख्या गाठली. बाबरने ५२ चेंडूत ६८ धावा तर रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावा केल्या. किक्रेटच्या कोणत्याही प्रकारच्या विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तान भारताविरुद्ध विजयी ठरला आहे. एकाही भारतीय गोलंदाजाला पाकिस्तानची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. या विजयामुळे पाकिस्तानमध्ये एकच जल्लोष झाला.

 


हे ही वाचा – Diwali Bonus Investment Tips : ‘दिवाळी बोनस’ फॉलो करा टिप्स, खिसा होणार नाही खाली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -