घरदेश-विदेशCovid 19 Vaccine: ...म्हणून पॅलेस्टाईनने इस्त्राईलसोबतच्या लसीचा करार केला रद्द

Covid 19 Vaccine: …म्हणून पॅलेस्टाईनने इस्त्राईलसोबतच्या लसीचा करार केला रद्द

Subscribe

पॅलेस्टाईन अ‍ॅथॉरिटीने शनिवारी काही तासांपूर्वी कोरोना लसींचा करार रद्द केला आहे. या करारांतर्गत इस्रायलने शुक्रवारी कोविड -१९ च्या लसीचे जवळपास १० लाख डोस पॅलेस्टाईनला पाठविल्याचे सांगितले आहे. त्या बदल्यात, पॅलेस्टाईन या वर्षाशेवटी या लसीचे तितकेच डोस इस्राईलला परत करणार आहे. यासह पॅलेस्टाईन असेही सांगितले की, पश्चिमेकडे इस्राईलमार्फत पाठविल्या जाणाऱ्या डोसचा वापर लवकरच संपणार असून त्यांचे निकष पूर्ण झाले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. यापूर्वी इस्रायलनेही या कराराची घोषणा केली होती, यावेळी असे म्हटले की, त्यांच्या वापराचा कालावधी लवकरच संपुष्टात येणार आहे. असे असले तरीही त्यांनी त्याची कोणतीही तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही.

जगभरात कोरोनाचा प्रादु्र्भाव सुरू असताना इस्त्राईलने प्रौढ लोकसंख्येच्या ८५ टक्के लसीकरणाद्वारे निर्बंध हटविले आहेत, परंतु पश्चिम भाग आणि गाझा येथे वास्तव्य करणाऱ्या साडेचार लाख पॅलेस्टाईन नागरिकांना लसीचे वाटप न केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला आहे. हा करार रविवारी सत्तेत असलेल्या इस्रायलच्या नव्या सरकारने जाहीर केला होता. दरम्यान, इस्त्रायली सरकारने असे म्हटले की, इस्त्रायली सरकार पॅलेस्टाईन प्राधिकरणाला ज्या लसींची तारीख लवकरच संपणार आहे, अशा फायझर लसींचे डोस पुरवतील. त्या बदल्यात पॅलेस्टाईन प्राधिकरण औषध कंपन्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये इस्रायलला समान प्रमाणात लस डोस हस्तांतरित करणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ६० हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या १ हजार ६४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण ९७ हजार ७४३ कोरोना (Coronavirus) रुग्ण बरे होऊ घरी परतले. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे ६२ हजार ४८० कोरोना रुग्ण सापडले होते. या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २,९८,२३,५४६ वर गेला आहे. देशात २ कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८५ हजार १३७ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावले आहेत

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -