घरदेश-विदेशAadhar-PAN link: ३१ मार्चच्या आत आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा भरावा लागेल...

Aadhar-PAN link: ३१ मार्चच्या आत आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा भरावा लागेल ‘इतका’ दंड

Subscribe

पॅन कार्ड, आधार कार्ड ही सरकारी कागदपत्रं ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी देखील उपयोगी येतात. सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. अशा स्थितीमध्ये या कालावधीत जर तुम्ही पॅन व आधार कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

पॅन कार्ड, आधार कार्ड ही सरकारी कागदपत्रं ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी देखील उपयोगी येतात. सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. अशा स्थितीमध्ये या कालावधीत जर तुम्ही पॅन व आधार कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे.

पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सरकारने याआधी देखील अनेकदा वाढवली आहे. आता ही मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे PAN आणि Aadhaar Card लिंक नसल्यास त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.

- Advertisement -

जर तु्म्ही आधार-पॅन कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अधिसूचनेनुसार ३१ मार्चनंतरही तुम्ही पॅन-आधार लिंक करू शकता. यासाठी ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. म्हणजेच ३१ मार्चनंतर पुढच्या तीन महिन्याच्या आत पॅन-आधार लिंक केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. हा दंड भरल्यानंतर तुम्ही आधार-पॅन लिंक करू शकता. तसंच, ३ महिन्यांनतर म्हणजे जूनपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास १००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

ऑनलाइन असे लिंक करा आधार आणि पॅन कार्ड

- Advertisement -
  • यासाठी सर्वात प्रथम इनकम टॅक्सची ई-फाइलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
  • येथे डाव्या बाजूला क्विक लिंक्समध्ये ‘लिंक आधार’चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला आधार आणि पॅनशी संबंधित माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.

SMS च्या माध्यमातून लिंक करू शकता पॅन-आधार

तुमच्या पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून UIDPAN <१२ डिजीट आधार नंबर> <१० डिजीट पर्मेनेंट अकाउंट नंबर> हे लिहून ५६७६७८ आणि ५६१६१ यावर एसएमएस करा. या प्रोसेसनंतर तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल. तसेच, आधीपासून पॅन आणि आधार कार्ड लिंक असल्यास तुम्हाला याबाबतची देखील माहिती मिळेल. म्हणजेच, तुम्ही एसएमएस पाठवून देखील तुमचे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.


हेही वाचा – Car Price in India: कार खरेदी करणं महागणार, 1 एप्रिलपासून किमती वाढणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -