Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशPAN Card : आता मिळणार बारकोड असलेले पॅनकार्ड; सरकारचा मोठा निर्णय

PAN Card : आता मिळणार बारकोड असलेले पॅनकार्ड; सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत नवीन निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी PAN 2.O प्रोजेक्टसाठी मंजुरी देण्यात आली असून या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने 1435 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

मुंबई : आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत नवीन निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी PAN 2.O प्रोजेक्टसाठी मंजुरी देण्यात आली असून या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने 1435 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. (Central Government pan card 2 .0 project which have QR code.)

हेही वाचा : Atal Setu : शिवनेरीच्या अटल सेतू प्रवासाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

- Advertisement -

नव्या प्रकल्पाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी संसदेत दिली आहे. यामध्ये पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले म्हणाले. तसेच या योजनेनुसार सर्वांना नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. सध्याच्या पॅनकार्डधारकांना त्यांचे पॅन कार्ड बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन 2.0 प्रकल्प सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे सरकारी यंत्रणांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन एक कॉमन आयडेंटिफायर म्हणून पात्र ठरणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

हेही वाचा  Assembly Election 2024 : शिंदे अन् ठाकरे 51, तर शरद पवार विरुद्ध अजितदादांचे उमेदवार 40 जागांवर भिडले; कोण ठरलं वरचढ?

- Advertisement -

तसेच सर्वसामान्यांना यामुळे अनेक प्रश्न पडणार हे लक्षात घेता, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत अनेक मुद्दे स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले, तुमचे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही, पॅन अपग्रेडेशन विनामूल्य केले जाणार आहे. तसेच त्यासाठी तुम्हाला घरपोच सेवा दिली जाणार आहे. तसेच आतापर्यंत पॅनकार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर 15 ते 20 वर्षे जुने असल्याने यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र आता नव्या प्रणालीअंतर्गत पॅनकार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात येईल, असेही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -