घरट्रेंडिंगट्विटर 'पनौती' टॉप ट्रेंडिंगला, व्हायरल भन्नाट मिम्सचे कारण वाचा

ट्विटर ‘पनौती’ टॉप ट्रेंडिंगला, व्हायरल भन्नाट मिम्सचे कारण वाचा

Subscribe

मंगळवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर मोदींना पनौती म्हणत अनेक मिम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल काही सांगता येत नाही. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर दरदिवशी अनेक नव्या गोष्टी ट्रेंड होत असतात. आज ट्विटरवर #पनौती (Panauti) टॉप ट्रेंगिगला आहे. काही वेळातच या ट्रेंडनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. पनौती म्हणत अनेक मिम्स मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत. (panauti Hashtag trending in twitter, memes viral on social media) आता सोशल मीडियावर एखादा हॅशटॅग ट्रेंड होण आणि काही वेळताच टॉप ट्रेडिंगला जाणे यामागे कारण देखील तितकेच खास असणार. विश्वास बसणार नाही परंतु ‘पनौती’ असा हॅशटॅग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्रेंड होत आहे. देशातील नेटकरी पंतप्रधान मोदींना ‘पनौती’ असे म्हणत आहेत. मंगळवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर मोदींना पनौती म्हणत अनेक मिम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. यामागचे कारण देखील तितकेच मजेशीर आहे असे म्हणायला हरकत नाही.

व्हायरल होणाऱ्या भन्नाट मिम्सचे कारण वाचा

त्याचे झाले असे की आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics, Tokyo 2020) आज पुरुष हॉकी संघाची सेमी फाइनल मॅच होती. भारताला पुरुष हॉकी संघाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट केले आणि #पनौती हा ट्रेंड सुरू झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीचे १० मिनिटे जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केले ज्यात त्यांनी ‘भारत आणि बेल्जिअममध्ये सुरू असलेला हॉकीचा सेमीफाइनल सामना ते पाहत आहेत’, असे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या ट्विटनंतर सेमीफाइनलमध्ये भारतीय हॉकी संघाची कामगिरी खालावली आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा बेल्जिअम विरुद्धच्या सेमीफाइनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. एकीकडे भारतीय हॉकी संघ सेमीफाइनल हरला तर दुसरीकडे काही वेळात ट्विटरवर Panauti हा हॅशटॅक टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आणि त्यानंतर लोक पंतप्रधान मोदींना पनौती म्हणून ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान केले आहे की, मोदींनी भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफाइनल मॅच बघू नका अन्यथा महिला संघाचा देखील यात पराभव होईल. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पराभवाला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचे म्हणत #panautiअसे म्हणत आहेत.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

- Advertisement -

पहा ट्विटर सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये असलेले काही #Panauti मिम्स

 


 

हेही वाचा – Tokyo Olympics : उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कर्णधाराशी पंतप्रधान मोदींची चर्चा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -