घरCORONA UPDATEखवल्या मांजराची कोरोना टेस्ट होणार; हे आहे कारण

खवल्या मांजराची कोरोना टेस्ट होणार; हे आहे कारण

Subscribe

ओडिशा राज्यातील अथागड वन विभागाने सोमवारी रात्री बारांबा रेंज येथील महुलिया नामक गावातानू एका खवल्या मांजराची सुटका केली. या गावात क्वारंटाई सेंटर आहे. महुलियाच्या सरपंचानी दिलेल्या माहितीनंतर वन विभागची रेस्क्यू टीम या मांजरीला वाचविण्यासाठी पोहोचली. अथागढच्या विभागीय वन अधिकारी सस्मिता लेनका यांनी सांगितले की, अथागढमधील क्वारंटाईन सेंटरमधून खवल्या मांजराला आणले गेले आहे, त्यामुळे आम्ही त्याची कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

 

जर्नल नेचरमध्ये छापून आलेल्या एका अहवालात वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, ज्या प्रकारे माणसांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण होते. त्याप्रकारे हा शांत प्राणी देखील कोरोना व्हायरसला पसरवणारा होस्ट होऊ शकतो. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, वटवाघूळापासून निघालेला व्हायरसने खवल्या मांजराला आपले होस्ट बनविले होते. त्यानंतर जो डेव्हलप झालेला व्हायरस बाहेर पडला त्याने एक नवीन रुप घेतले होते. त्या व्हायरसला Sars Cov-2 असे म्हटले गेले आहे.

- Advertisement -

अथागढच्या वनाधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशात पहिल्यांदाच एखाद्या खवल्या मांजराची टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर काही वैज्ञानिकांनी देखील कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसाठी वटवाघुळासोबत खवल्या मांजराला देखील जबाबदार धरले होते. मात्र याची खातरजमा अजून झालेली नाही.

ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशात आतापर्यंत १ लाख ३१ हजार ५९५ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी १,५१७ लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -