घरताज्या घडामोडीड्रॅगनचा पेगाँगवर डोळा, फिंगर ४ वर सैनिकांची जमवाजमव

ड्रॅगनचा पेगाँगवर डोळा, फिंगर ४ वर सैनिकांची जमवाजमव

Subscribe

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या २५ दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली असली तरी देखील चीनचा अजूनही ड्रॅगनचा पेगॉंगवर डोळा असल्याचे दिसून आले आहे.

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या २५ दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे. गुरुवारी सैन्याने सांगितले की, ‘दोन्ही देशांच्या सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट – १७ व्या स्थानावरुन दोन किमीने माघार घेतली आहे. तर गलवान खोऱ्यातील घाटी येथे दोन्ही सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट – १५ व्या स्थानावरुन माघार घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता चीनची सेना सुमारे दोन किमी मागे गेली आहे. तर दुसरीकडे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागात सैन्याने माघार घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, एकीकडे माघार घेतल्याचे दिसून येत असले तरी चीनचा अजूनही ड्रॅगनचा पेगॉंगवर डोळा असून पश्चिमच्या फिंगर ४ वर सैनिक तैनात आहेत. विशेष म्हणजे हे सैनिक फिंगर ८ येथून ८ किलोमीटर आता आले आहेत.

बीजिंगमध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, ‘कमांडर स्तरावरील चर्चेत एकमत झाल्यानंतर चीनी आणि भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यातील घाटी आणि पश्चिम भागातील इतर भागात विघटनासाठी ‘प्रभावी उपाय’ केले आहेत. त्यामुळे भारतासह सीमेवर एकंदर परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे. या व्यतिरिक्त, संवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशांकडे अनेक माध्यम देखील उपलब्ध आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे दोन्ही देशाचे सैन्य माध्यमांद्वारे संवाद सुरू ठेवतील. ज्यामध्ये कमांडर-स्तरीय चर्चा केली जाईल. या व्यतिरिक्त भारत-चीन सीमेवरील बाबींविषयी समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेची बैठक देखील होणार आहे. तसेच आम्हाला आशा आहे की, भारत चीनसोबत काम करेल आणि सीमाभागातील संयुक्तपणे निर्माण झालेला तणाव कमी होईल’.


हेही वाचा – चिंता वाढली! देशातील बाधितांचा आजचा आकडा धडकी भरणारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -